Saturday, May 18, 2024

Latest Posts

आदित्य ठाकरेंची मुंबईती निष्ठा यात्रा, शिवसैनिकांशी साधणार संवाद

शिवसेना पक्षात आमदारांचे मोठे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मुंबई : शिवसेना पक्षात आमदारांचे मोठे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पर्यंत तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिदें गटाला पाठिंबा दिला. या मोठ्या बंडानंतर शिवसेनेचे उघड उघड दोन भाग पाडले आहेत. याच फुटीमुळे शिवसेना संपणार असा दावा विरोधकांकडून केला जातोय.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षात नवचौतन्य निर्माण करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ते निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार असून कार्यकर्त्यांशी व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये अडथळा

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतले मुंबईतील अनेक प्रकल्प आता राज्यसरकार रोखणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना हाताशी धरून आदित्य ठाकरेंनी हे प्रकल्प राबवले होते. त्या प्रकल्पांना आता राज्य सरकार रोखणार असल्याची माहिती मिळत आहे. खारं पाणी गोडं करण्याच्या खर्चिक प्रकल्पाचाही यात समावेश आहे. मुंबई भाजपचा या प्रकल्पांना कडाडून विरोध होता. आशिष शेलार यांनी याबाबत अनेकदा पाठपुरावाही केला होता.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठु रखुमाईची महापूजा

आदित्य ठाकरे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, “आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका. पहिलाच निर्णय या सरकारनं मुंबईच्या विरोधात घेतला आहे. मुंबईचे भलं करण्याचा आपण विचार करत होतो, त्याच्या विरोधातील निर्णय या सरकारने घेतले. मुंबईनं नेहमी शिवसेनेची साथ दिली आहे. सरकार चांगल काम करत होतं, तरी आमच्या पाठीत का खंजीर खुपसण्याचे काय कारण ? जी चांगली काम आहेत, त्याला अधिक गती देणं, त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. सरकार बदलंल म्हणून प्रोजेक्टला स्थगिती देणे हे योग्य नाही” असे आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटले.

आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह केली पांडुरंगाची पूजा

Latest Posts

Don't Miss