Saturday, May 18, 2024

Latest Posts

”तुझा ही मुसेवाला करू”; अभिनेता सलमान खान ला धमकी

अभिनेता सलमान खान व त्याचे वडील सलीम खान या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) ला एका अज्ञात व्यक्तीकडुन जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. सलमान खान याचे वडील जेष्ठ लेखक व दिग्दर्शक सलीम खान (Salim Khan) यांना हे धमकीचे पत्र सापडले. या पत्रात अभिनेता सलमान खान व त्याचे वडील सलीम खान या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलीम खान यांनी प्रकरणाबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात पत्र पाठवणाऱ्या त्या अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सलीम खान यांना मिळाले पत्र

रविवार, दिनांक ५ जून ला सकाळी ७:३० वाजता सलीम खान धावण्यासाठी घराबाहेर पडले, तिथून ते एका बाकावर बसले तेव्हा त्यांना हे धमकीचे पत्र मिळाल्याचे त्यांनी मुंबई पोलिसांना सांगितले. हे पत्र वांद्रे पोलिसांकडे देण्यात आले आहे. या पत्रात ”मुसेवाला जैसा कर दूंगा” असे लिहिण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे अभिनेता ही सलमान खान रोज या ठिकाणी फिरण्यासाठी जातो. सध्या पोलीस त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलीस प्रशासनात या गोष्टीमुळे खळबळ उडाली आहे.

सलमान खानच्या सुरक्षितेत वाढ

पोलिसांकडून अभिनेता सलमान खानच्या सुरक्षितेत वाढ केली आहे. सलमान च्या घराबाहेर पोलिसांचं एक पथक तैनात करण्यात आल्याचे सांगितले जातेय.
या आधी ही गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यांच्याकडून अभिनेता सलमान खान ला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समजते. त्यातच काहीच दिवसांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेव्हपासूनच सिनेसृष्टीत भीतीचे वातावरण आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिष्णोई टोळीशी असल्याने सलमानच्या जीवालाही धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितले जाते आहे.

Latest Posts

Don't Miss