Tuesday, May 21, 2024

Latest Posts

संतोष जुवेकरची झाली ‘या’ अभिनेत्यासोबत हाणामारी

भांडण अक्षरशः हाणामारी पर्यंत आलं आणि पुढे जे घडलं ते...

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील एक तारा म्हणजेच संतोष जुवेकर. सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. संतोष सतत काही ना काही पोस्ट करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यात अगदी अग्रेसर असतो. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकतचं संतोष जुवेकरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत संतोष जुवेकर आणि अभिनेता मनोज बाजपेयी यांच्यात हाणामारी घडल्याची दिसून येतेय. Santosh Juvekar shared post about fighting with actor

 

“माझी आणि मनोज बाजपेयीचं (Manoj Bajpayee) भांडण अक्षरशः हाणामारी पर्यंत आलं आणि पुढे जे घडलं ते सांगतो तुम्हाला. पुरावा म्हणुन हा व्हिडिओ पोस्ट करतोय”, असे कॅप्शन देत संतोष जुवेकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा विडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ खाली संतोषच्या चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कंमेंटस केल्या आहेत.

या शेअर केलेल्या व्हिडिओत नेमकं कशामुळे हाणामारी झाली आहे हे कळतं नव्हतं. परुंतू आज पुन्हा एकदा संतोष जुवेकर ने एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल खुलासा केला आहे. मनोज बाजपेयी आणि संतोष जुवेकर यांनी याआधी भोंसले चित्रपटात एकत्र काम केले होते. ही मारामारी त्याच चित्रपटाचा एक भाग असल्याचं संतोष ने म्हटलं आहे. आज भोसले या चित्रपटाला २ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने संतोष ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रपटातील शेवटच्या भागातील मारमारीचा हा मेकिंग व्हिडिओ असल्याचं संतोषने सांगितले. शूटिंगचे दिवस आठवत त्याने ही पोस्ट केली असल्याचं ही सांगितलं.

याआधी संतोषचा ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटी वर रिलीज झाला.  या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने याआधी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यानी केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्यात.

Latest Posts

Don't Miss