Saturday, May 18, 2024

Latest Posts

ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर चा भाऊ सिद्धांत कपूर ला अटक

सिद्धांत सह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर किंवा अभिनेते शक्ती कपूर यांच्याकडून सिद्धांतच्या पोलीस कोठडीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आतापर्यंत आलेले नाही.

ड्रग्स प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना पोलीस चौकीची पायरी चढावी लागली होती.यातच आता बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री श्रध्दा कपूर चा भाऊ सिध्दांत कपूरला रविवारी रात्री बंगरुळ येथून पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धांतवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे, पोलिसांची ही कारवाई बेंगळुरूच्या एमजी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये पार्टीवर छापा टाकताना करण्यात आली. सिद्धांत रविवारी बंगरुळ येथील एका हॉटेलमध्ये पार्टी साठी गेला होता असे सांगण्यात येते.

एमजी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये सिद्धांत आणि इतर सहा जण पार्टी करत होते असे सांगण्यात येत आहे. हॉटेलमधील रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीमध्ये अंमली पदार्थ तसंच ड्रग्स चा समावेश करण्यात आला होता. पार्टी मध्ये एकूण ३५ जणांचा समावेश होता. सिध्दांत सह सगळ्यांची चाचणी करण्यात आली आणि रिपोर्ट नुसार ६ जणांनी ड्रग्स घेतल्याचं दिसून आलं, यावेळी सिद्धांत सह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर किंवा अभिनेते शक्ती कपूर यांच्याकडून सिद्धांतच्या पोलीस कोठडीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आतापर्यंत आलेले नाही.

सिद्धांत बद्दल सांगायचं झालं तर त्याने अभिनय क्षेत्रात काम केले आहे. पण त्याला अजूनही हवे तसे यश मिळालेलं नाही. बॉलिवूड चित्रपटांमध्ये सिद्धांत नशीब चालले नाही असे म्हणावे लागले. सिध्दांत ने हसीना पारकर या चित्रपटात श्रद्धा कपूर सोबत एकत्र काम केले होते. हल्लीच तो सिद्धांत ‘चेहरे’ चित्रपटात दिसला होता.

Latest Posts

Don't Miss