Saturday, May 18, 2024

Latest Posts

दाक्षिणात्य अभिनेत्री Samantha Prabhu घेणार अभिनय क्षेत्रातून ब्रेक

मंथा रुथ प्रभू ही एक भारतीय अभिनेत्री असून तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत भरपूर नाव कमावले. भारतातील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये समंथा प्रभूचे नाव येते. समंथाने आपल्या दमदार अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली.

समंथा रुथ प्रभू ही एक भारतीय अभिनेत्री असून तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत भरपूर नाव कमावले. भारतातील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये समंथा प्रभूचे नाव येते. समंथाने आपल्या दमदार अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या ‘ऊ अंटावा’ या तिच्या गाण्यानं लोकांना वेड लावले आहे. त्यातच आता समंथाने मोठा निर्णय घेत अभिनयक्षेत्रातून ब्रेक (Break) घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘शाकुंतलम’ या चित्रपटानंतर समांथा प्रभू तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमुळे (Web series) चर्चेत आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. त्यातच आता ती बॉलीवूड (Bollywood) अभिनेता वरून धवनसोबत तिच्या आगामी ‘सिटाडेल’ (Citadel) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. त्याचबबरोबर तिचा ‘कुशी हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडबरोबर समांथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सर्व व्यस्त व्यापामुळे तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी (Health care) घेण्यासाठी समंथाने एक वर्षांकरिता अभिनय क्षेत्रातून ब्रेक (Break) घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया माहितीनुसार, समांथाच्या सूत्रांनी सांगितले आहे की, अभिनेत्रीने आपल्या सर्व चित्रपटांचे शूटिंग संपवले आहे आणि त्यानंतर ती एक वर्षांचा ब्रेक घेणार आहे. यावेळात ती पूर्णपणे स्वतःच्या आरोग्यावर लक्ष देणार आहे. सध्या ती ‘कुशी’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहे, जे दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल. हा चित्रपट तिचा शेवटचा चित्रपट असेल. तसेच ‘सिटाडेट’ (Citadel) सीरिजचेही शूटिंग आता लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता समंथाचा लवकरच एक वर्षांचा ब्रेक सुरु होणार आहे. या ब्रेकमध्ये ती पूर्णपणे आरोग्यवर लक्ष देणार असून त्यासाठीचे वेळापत्रक ती तयार करत आहे. त्याचबरोबर तिने एड्वान्समध्ये (advance) निर्मात्यांकढून घेतलेले मानधनही परत केले आहे. दरम्यान समांथा ‘मायोसायटिस’ (Myositis) नावाच्या एका ऑटोइम्यून (Autoimmune) आजाराने त्रस्त आहे. या आजाराबाबतची माहिती तिने स्वतः सोशल मीडियाच्या साहाय्याने एका पोस्टद्वारे चाहत्यांना दिली होती.

हे ही वाचा:

नेत्यांच्या कुंडलीत दडलंय काय? | Time Maharashtra | Maharashtra Politics

Salaar चा धमाकेदार टीझर आऊट, प्रभासचा लूक पाहून अंगावर शहारे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss