Friday, May 17, 2024

Latest Posts

सुपरस्टार रजनीकांत बनले तामिळनाडूतील सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी

आता साऊथचे सुपरस्टार रजनीकांतसोबतही हेच घडले आहे. रजनीकांत हे तामिळनाडूतील सर्वाधिक कर भरणारेसेलिब्रिटी बनले आहेत आणि त्यांना सन्मानपत्रही देण्यात आले आहे. हा सन्मान त्यांची मुलगी ऐश्वर्या तिने घेतला आहे.

मुंबई: हल्लीच अक्षय कुमारशी संबंधित ही माहिती समोर आली की, तो बॉलिवूडचा सर्वाधिक टॅक्स देणार सेलिब्रिटी होता. त्यांनाप्आयकर विभागाकडून सन्मानपत्रही देण्यात आले. आणि आता साऊथचे सुपरस्टार रजनीकांतसोबतही हेच घडले आहे. रजनीकांतहे तामिळनाडूतील सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी बनले आहेत आणि त्यांना सन्मानपत्रही देण्यात आले आहे. हा सन्मान त्यांची मुलगी ऐश्वर्या तिने घेतला आहे

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिला एका कार्यक्रमात तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रजनीकांत हे तमिळनाडूतील अनेक वर्षांपासून सर्वाधिक कर भरणारे अभिनेते आहेत. 24 जुलै 2022 रोजी अक्षय कुमारला देखील सरकारने सर्वोच्च करदाता पुरस्कारही दिला.आयकर विभागाने त्यांना हे प्रमाणपत्र दिले आहे.

ऐश्वर्या म्हणाली ‘मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे’ तीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोस शेअर केले आहेत आणि ऐश्वर्या रजनीकांतने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला अभिमानआहे की मी सर्वात जास्त कर भरणाऱ्यांपैकी एकाची मुलगी आहे. अप्पांचा सन्मान केल्याबद्दल तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या इन्कमटॅक्स विभागाचे खूप खूप आभार. रजनीकांतच्या यांच्या कामाबाबदल बोलायचे झाले तर, हे लवकरच नेल्सन दिलीपकुमारच्या ‘जेलर’ चित्रपटात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांनी चित्रपटासाठी 150 कोटी रुपये मानधन घेत आहेत. आत्तापर्यंत देशात कोणत्याहीअभिनेत्याने इतके मानधन घेतले नव्हते.

Latest Posts

Don't Miss