Friday, May 17, 2024

Latest Posts

तेजश्रीचा हटके उमक्रम, मृत्यूनंतर करणार नेत्रदान

तेजश्रीने नेत्रज्ञान करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजश्रीने तिच्या पश्चात गरजू व्यक्तीला तिचे डोळे दान करणार आहे.

मुंबई : कलाकार म्हटलं कि कोणत्या ना कोणत्या कारणातून ते चर्चेत राहतातच. कधी सकारात्मक, तर कधी ट्रोलिंगमुळे या चर्चा अधिक रंगल्या जातात. कित्येक वेळेला कलाकारांच्या पोस्टमुळे त्यांची चर्चा होते. तेजश्री प्रधानच्या बाबतीत काहीस असं घडलंय. तेजश्री प्रधान जे काही करते ते नेहमी हटके असतं. ती नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. मालिका, सिनेमांमधून तिने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच तेजश्री तिच्या सोशल मीडिया पोस्ट मधून चाहत्यांशी संवाद साधत असते. सध्या तेजश्रीची अशीच एक पोस्ट प्रचंड व्हायरल होतेए.

या पोस्टमध्ये, तेजश्रीने नेत्रज्ञान करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजश्रीने तिच्या पश्चात गरजू व्यक्तीला तिचे डोळे दान करण्या तयेणार आहे. तिने घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या सोशल मीडियावर ती कमालीची चर्चेत येत आहे. तेजश्रीने नुकताच नेत्रज्ञाना चाफॉर्म भरला आहे. तेजश्रीने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल तिच्या चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तेजश्री सक्षम या सामाजिक संस्थेशी जोडली गेली आहे. या संस्थेअंतर्गत ती नेत्रदान करणार आहे.

तेजश्रीची लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी या घरची’ यामधून ती घराघरात पोहचली. तेजश्रीचा ‘ती सध्या काय करते’ या सिनेमावर प्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रेम केलं. रंगभूमीवर देखील तिने स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. फक्त मराठीमध्ये नाही तर तेजश्रीने हिंदीमध्ये देखील आपली अभिनयाची बाजू प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. बबलू बॅचलर या चित्रपटात श्रमण जोशी आणि तेजश्री प्रधान यांची जोडजोडी जमली. असून त्यांनी यादी एका नाटकामध्ये देखील काम केले आहे. तेजश्रीने आतापर्यंत केलेल्या प्रत्येक भूमिका अगदी लक्षात राहण्यासारख्या आहेत.

Latest Posts

Don't Miss