‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील फर्स्ट लूक झाला रिलीज

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या वारंवार चर्चेत असते. मग त्या चर्चा तिच्या कामाबद्दल असो किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल असो.

‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील फर्स्ट लूक झाला रिलीज

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या वारंवार चर्चेत असते. मग त्या चर्चा तिच्या कामाबद्दल असो किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल असो. ती नेहमीच सर्व नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. तेजस्वी तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या भेटीला येणारी तेजस्वी लवकरच मोठ्या मराठी रुपेरी पडदयावर आपल्याला दिसणार आहे.

नुकताच आगामी ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re) या चित्रपटातील तेजस्वीचा ‘फर्स्ट लूक’ (First Look) रिलीज झाला आहे. यातून तिचा बबली आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘श्रुती’ असं तिच्या चित्रपटातील भूमिकेचं नाव आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या व्हिडीओमधील तिचा चुलबुला आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटात तेजस्वी सोबत अभिनेता अभिनय बेर्डे (Actor Abhinay Baird) झळकणार आहे. या दोघांची ‘लव्हेबल केमिस्ट्री’ आपल्या चाहत्यांची मने जिंकायला सज्ज झाली आहे.

तेजस्वीनं सोशल मीडियावर (Social media) तिच्या मन कस्तुरी रे चित्रपटातील लूक शेअर केला आहे, ‘ती…पहाटे पडलेलं गोड स्वप्न. ती…सांजवेळी बहरलेल्या मोगऱ्याचा सुगंध. तिच्या सोबतीचे क्षण हवेहवेसे. तिला पाहता मन कस्तुरी रे! मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय एक गोड हसरा चेहरा … ‘श्रुती’ च्या भूमिकेत.. तेजस्वी प्रकाश’ असं कॅप्शन तेजस्वीनं तिच्या पोस्टला दिलं आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे.

हे ही वाचा:

चांगल्या भूमिका साकारता आल्या नाही, अभिनेत्री उषा नाडकर्णींनी केली खंत व्यक्त

दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार प्रभास आणि सैफ अली खानच्या आदिपुरुषचा टीझर?

Flipkart Big Billion Days सेल होतोय सुरु; Apple iPhone 13 बँक ऑफर आणि सवलतींसह 35,000 रुपयांच्या खाली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version