Thursday, May 2, 2024

Latest Posts

दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार प्रभास आणि सैफ अली खानच्या आदिपुरुषचा टीझर?

या भव्य चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अवघ्या १०३ दिवसांत पूर्ण झाले होते.

आदिपुरुषच्या निर्मात्यांनी अखेर दसऱ्याची खास मेजवानी म्हणून चित्रपटाचा बहुप्रतिक्षित फर्स्ट लुक आणि टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निर्माते आदिपुरुषाचे टीझर रिलीज करतील या अनुमानाने इंटरनेट गजबजले होते, दरम्यान, या ओम राऊत-दिग्दर्शित रामायण महाकाव्याचा टीझर ऑक्टोबरच्या सुरुवातीला, बहुधा महिन्याच्या ३ तारखेला लॉन्च केला जाईल

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित या चित्रपटाचा टीझर ‘दसर्‍या’च्या दोन दिवस आधी रिलीज होत आहे. गंमत म्हणजे यावेळी प्रभास दिल्लीत ‘दसरा’ साजरा करताना दिसणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीतील लवकुश रामलीला समिती लाल किल्ल्याच्या मैदानावर अयोध्येतील राममंदिराची थीम असलेला सेट बनवणार आहेत. प्रभास यावर्षी ५ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यापूर्वी अक्षय कुमार , अजय देवगण आणि जॉन अब्राहम सारखे कलाकार रावण दहनात सहभागी झाले होते.

आदिपुरुष हा सर्वात मोठा भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो आणि भूषण कुमार यांनी टी सीरीज या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. यात प्रभास भगवान राम, कृती सेनन सीता आणि सैफ अली खान रावणच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शक ओम राऊत यांनी पिंकविलासी बोलताना म्हटले होते की पडद्यावर भगवान रामची भूमिका करण्यासाठी प्रभास हा एक आदर्श पर्याय आहे. “माझ्या माहितीनुसार, डोळे हे हृदयाचे प्रतिबिंब आहेत आणि प्रभास इतका शुद्ध आत्मा आहे की त्याचे डोळे शांत आहेत. त्याच्या डोळ्यांनी, मी माझ्या प्रभू रामाच्या कल्पनेच्या अगदी जवळ पोहोचलो.”

या भव्य चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अवघ्या १०३ दिवसांत पूर्ण झाले होते. प्रभास शेवटचा राधे श्याममध्ये दिसला होता, जो प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला होता. आता या चित्रपटाकडून प्रभासच्या चाहत्यांना खूप आशा आहेत. आदिपुरुष या चित्रपटाचे एकाच वेळी हिंदी आणि तेलुगूमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे, व्हीएफएक्स इफेक्ट्सचा देखील या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे सांगण्यात येत आहे आणि १२ जानेवारी रोजी संक्रांती दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

चांगल्या भूमिका साकारता आल्या नाही, अभिनेत्री उषा नाडकर्णींनी केली खंत व्यक्त

सांगलीत मनपा स्थायी सभापतीपदी निवडणुकीत भाजपचा विजय तर, काँग्रेसच्या पदरी अपयश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss