Tuesday, May 21, 2024

Latest Posts

‘टायटॅनिक’ व ‘द ओमेन’ चित्रपटातील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचे 80 व्या वर्षी निधन

प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेता डेव्हिड वॉर्नर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. डेव्हिड हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर रविवारी 24 जुलै रोजी लंडनमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांनी हॉलीवूडच्या अनेक सिनेमांतून काम केले आहे.

अभिनेता डेव्हिड वॉर्नर टायटॅनिक आणि ओमेन सारख्या सिनेमांसाठी अधिक ओळखले जातात. आपल्या शेवटच्या दिवसांत ते नॉर्थवूडच्या डेनव्हिल हॅलमध्ये राहत होते. डेव्हिड वॉर्नर यांनी दोन लग्न केले होते. आता त्यांच्या पश्चात पत्नी लिसा, मुलगा ल्यूक आणि सून, पहिली पत्नी हॅरिएट इव्हान्स असा परिवार आहे.

1971 च्या मानसशास्त्रीय थ्रिलर “स्ट्रॉ डॉग्स”, 1976 च्या हॉरर क्लासिक “द ओमेन”, 1979 च्या टाइम-ट्रॅव्हल अॅडव्हेंचर “टाइम आफ्टर टाइम” मध्ये वॉर्नरने अनेकदा भूमिका केल्या होत्या. वॉर्नर हे जॅक द रिपर होते आणि 1997 च्या ब्लॉकबस्टर “टायटॅनिक” चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली. ते 70 आणि 80 च्या दशकातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते.

हेही वाचा : 

आनंदाची बातमी! शेअरधारकांना बजाज फिनसर्व देणार बोनस शेअर भेट…

Latest Posts

Don't Miss