Prajakta Mali म्हणतेय ‘कर्ज फेडायला करावं लागतं बाबा’, कारण काय?

Prajakta Mali म्हणतेय ‘कर्ज फेडायला करावं लागतं बाबा’, कारण काय?

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनय आणि नृत्यामुळे ओळख निर्माण केली. प्राजक्ता २०११ मध्ये मराठी टेलिव्हिजन स्टार प्रवाह शो ‘सुवासिनी’ मध्ये दिसली होती. प्राजक्ताने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहेत. ‘जुळून येती  रेशीमगाठी’ या मालिकेतून घरा-घरात पोहचली. त्यावेळी ती सर्वोत्कृष्ट आवडती अभिनेत्री झाली. त्यानंतर प्राजक्ता आता वेब सिरीजमध्ये काम करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेयर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या एका पोस्टच्या कॅप्शनमुळे ती चर्चेत आली आहे.

एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान साडी नेसून नाजूक मेकअप करून शूट केले आहे. भांडी घासण्याचा साबण, कपडे धुवण्याची पावडर या जाहिरातीची शूटिंगचे काम सध्या सुरु होते. त्या दरम्यान व्हिडीओ शेयर करत त्याला ‘कर्ज फेडायला करावं लागतं बाबा’ असे कॅप्शन दिले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या माध्यमातून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकताच कर्जत येथे फार्म हाऊस विकत घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ही खुशखबर तिने चाहत्यांना दिली होती. हा फार्म हाऊस घेताना प्राजक्ताने मोठे कर्ज घेतले होते. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने तिचे स्वप्न पूर्ण झाले, असं प्राजक्ताने सांगितलं आहे. सर्वात मोठे कर्ज तिने घेतले असून ते नक्की याबद्दल सांगत आहे का अशी सगळीकडे चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा:

Taarak Mehta सोडण्याबाबत ‘टप्पू’ ने केला मोठा खुलासा, लवकरच येणार Bigg Boss मध्ये

Mumbai Indians चा सलग तिसरा विजय, ड्रेसिंग रूम मध्ये जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version