Friday, May 3, 2024

Latest Posts

Mumbai Indians चा सलग तिसरा विजय, ड्रेसिंग रूम मध्ये जल्लोष

काल मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्ज विरोधात सामना होता. मुंबई इंडियन्सने ९ धावांनी पंजाब किंग्ज वर विजय मिळवला. पंजाबच्या आशुतोष शर्माने अर्धशतक करत विजयाचा प्रयत्न केला होता परंतु जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झीने निर्णायक मारा करून मुंबईला विजयी केले. १८एप्रिल हा मुंबईसाठी तिसऱ्या विजयाचा दिवस होता.

काल मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरोधात सामना होता. मुंबई इंडियन्सने ९ धावांनी पंजाब किंग्ज वर विजय मिळवला. पंजाबच्या आशुतोष शर्माने अर्धशतक करत विजयाचा प्रयत्न केला होता परंतु जसप्रीत बुमराह आणि जेराल्ड कोएत्झीने निर्णायक मारा करून मुंबईला विजयी केले. १८ एप्रिल हा मुंबईसाठी तिसऱ्या विजयाचा दिवस होता.

मुंबईने सुरुवातीच्या फलंदाजीत १९२ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने मॅचची चांगलीच सुरवात केली होती. रोहितने २५ चेंडूत ३६ धावा केल्या होत्या. तर तिलक वर्माने १८ चेंडूत ३४ धावा आपल्या नावावर केल्या. सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्स साठी विशेष कामगिरी केली. सूर्यकुमार यादवनं केलेल्या अर्धशतकामुळे मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या करता आली. मुंबईच्या या विजयानंतर ड्रेसिंग रूम मध्ये जोरदार सेलिब्रेशन झाले. मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी याने ड्रेसिंग रूम मध्ये जात सूर्यकुमार, जसप्रीत आणि जेराल्डचे चांगलेच कौतुक केले. यानंतर मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्स म्हणत ड्रेसिंग रूम मध्ये एकच जल्लोष झाला. मुंबई इंडिअन्सच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डल वरून व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये सर्वजण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्स अश्या घोषणा दिल्या. बाजूला गोलंदाजी प्रशिक्षक मलिंगा देखील दिसून येत आहेत.

यानंतर एक व्हिडीओ वायरल होत आहे. जो दुसऱ्या डावाचा म्हणजे मुंबईच्या गोलंदाजीदरम्यानचा आहे. जेव्हा पंजाब किंग्जला विजयासाठी १२ धावांची गरज होती. यात पंजाबने ९ विकेट्स गमावल्या होत्या. मुंबईसाठीचे शेवटचे षटक करण्याची जबाबदारी आकाश माधवाल वर होती. अश्याप्रकारे मुंबई इंडियन्सने कालची मॅच आपल्या नावावर केली.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका, Parbhani, Nanded येथे आज प्रचारसभा

जनतेचे मुद्दे नसल्यानेच श्रीरामाच्या, धर्माच्या नावावर Narendra Modi मत मागतात, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss