Friday, May 3, 2024

Latest Posts

Taarak Mehta सोडण्याबाबत ‘टप्पू’ ने केला मोठा खुलासा, लवकरच येणार Bigg Boss मध्ये

तारक मेहता का उलट चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) यांनी ही मालिका सोडली असून तो व्लॉगिंगच्या माध्यमातून चाहत्यांना भेटतो. एका व्लॉगमध्ये राजने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. राज ने तारक मेहता मध्ये काम करायच का बंद केलं. असं सारखं विचारण्यात येतं. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी व्लॉगमध्ये दिलेले आहे. त्याने मालिकेत काम कसे केले याबद्दल देखील सांगितले आहे. यावेळी त्याला ‘बिग बॉस मध्ये जायची ऑफर मिळाली आहे. यामुळे राज बिग बॉसच्या घरात येणार का याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

तारक मेहता का उलट चष्मा का सोडलं याचा खुलासा त्यांनी केला आहे. माझ्या मनात नेहमी हा प्रश्न पडतो की मी तारक मेहता का सोडला? सलग ५ वर्ष मालिकेत काम करून १००० पेक्षा जास्त एपिसोड केले. पण आता दुसऱ्या भूमिकेसाठी उत्सुक आहे. दुसऱ्या भूमिका अनुभवायच्या आहेत. अजून ग्रो करायचा आहे. यासाठी मालिका सोडली आणि नवीन प्रोजेक्ट करायचा निर्णय घेतला आहे.

मला २०२२ आणि २०२३ मध्ये बिग बॉस ची ऑफर आल्या होत्या. मला ‘बिग बॉसमध्ये जायला आवडेल. मी या कार्यक्रमाचा खूप मोठा फॅन आहे. जर मला संधी मिळाली तर मी नक्की या शोमध्ये सहभागी होईन. दोनदा ‘बिग बॉसची ऑफर आली होती पण काही कारणामुळे मला त्यात सहभागी होता आलं नाही. असे त्याने सांगितले आहे.

हे ही वाचा:

उन्हाळयात बनवा आंबट गोड कैरीचे वरण

म्हणून मी मुल न होऊ द्यायचा निर्णय घेतला, ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss