Saturday, May 18, 2024

Latest Posts

ख्रिसमसच्या खरेदी करीता बाजारात शॉपिंगचे अनेक पर्याय उपलब्ध,कसा डेकोरेट करायचा ख्रिसमस ट्री

ख्रिसमसच्या खरेदी करीता बाजारात शॉपिंगचे अनेक पर्याय उपलब्ध,कसा डेकोरेट करायचा ख्रिसमस ट्री

डिसेंबर महिना आला की थंडीची चाहूल लागते . थंडीचा जोर वाढू लागल्यावर सगळ्येच उबदार कपडे घालण्यास सुरूवात करतात.पहाटे आणि संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी बागेत, जॉगिंग पार्कमध्ये जाण्याची गर्दी वाढू लागली आहे.हिवाळ्यातील प्रसन्न वातावरण आणखी आनंदी करण्यासाठी ख्रिसमस हा सण देखील डिसेंबरमध्ये असतो. मुंबई हे बहुधर्मीय, बहुसंस्कृतीचं प्रतिक असलेलं शहर आहे. मुंबईमध्ये अन्य कोणत्याही सणांप्रमाणेच ख्रिसमस हा देखील मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मुंबईतील मार्केटमध्ये ख्रिसमसची लगबग सुरू झाली आहे.

 मुंबईकरांना ख्रिसमसचे वेध

मुंबईतल्या बाजारपेठेचा फेरफटका मारल्यास सगळीकडं करण्यात आलेली लायटिंग, विक्रीसाठी उपलब्ध असलेली सांताची टोपी, सांताचा मास्क, हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानं, शॉपिंग मॉल्स यांच्यावर सजवलेले ख्रिसमस ट्री अशी जय्यत तयारी सुरू आहे. ख्रिसमसला आता तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला असल्यानं यासाठी आवश्यक असलेल्या शॉपिंगसाठी गर्दी वाढू लागली आहे. ख्रिसमसनिमित्त गिफ्ट्स, खाद्यपदार्थ यांची नातेवाईक आणि मित्रमंडळीत देवाणघेवाण केली जाते. लहान मुलांना या निमित्तानं स्पेशल गिफ्ट मिळतं. मुंबईच्या बाजारात अनेक आकर्षक गिफ्ट्स आणि सजावटीसाठी आवश्यक असलेलं साहित्य आता दाखल झालं आहे.

कोणत्या वस्तू उपलब्ध?

ख्रिसमस ट्री, हँगिंग सांता, स्नोमॅन, ड्रम्स, ख्रिसमस कॅन्डल, ख्रिसमस ट्रीला लटकवण्यासाठी चॉकलेट्स, लहान लहान गिफ्ट्स, लायटिंग असे अनेक प्रकार सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

हँगिंग सांता – ख्रिसमसच्या काळात  थीमनुसार घर, बाग, टेरेस सजवलं जातं. या सजावटीमध्ये तुम्ही हँगिंग सांता लावू शकता. 100 रुपयांपासून हँगिंग सांता बाजारात मिळतात.

ख्रिसमस कॅन्डल्स – ख्रिसमसला  घरात, अंगणात, टेरेसमध्ये करण्यात आलेल्या लायटिंगमुळे वेगळीच शोभा येते. या लायटिंगचे रंगीबेरंगी प्रकार, आकर्षक कॅन्डल्स या वस्तू 50 रुपयांपासून उपलब्ध आहे.

ख्रिसमस ट्री – ‘ख्रिसमस ट्री’ या सर्व सजावटीची मुख्य वस्तू आहे. 2 फुट ते 8 फुटपर्यंत ख्रिसमस ट्री विक्रीसाठी आले आहेत. 500 ते 6 हजार रुपयांपर्यंत या ट्रीची किंमत आहे.

स्नो मॅन – कापसापासून बनवलेले छोटे छोटे स्नो मॅन बाजारात मिळतात 100 रुपयांपासून हे स्नो मॅन उपलब्ध असून त्याची किंमत आकारानुसार वाढते.

‘ख्रिसमसची अनेकांना उत्सुकता असते. त्यामुळे डिसेंबर महिना सुरु होताच लोकं बाजारात सजावटीच्या वस्तू खरेदी करायला गर्दी करतात. सामान्य माणसाला सुद्धा ख्रिसमस साजरा करता यावा म्हणून आम्ही कमी भावात वस्तू विकतो,’ असं क्रॉफर्ड मार्केटमधल्या एका विक्रेत्याने सांगितलं.

हे ही वाचा:

‘फायटर’ चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित

अपात्र आमदार निकालासाठी राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss