टाईम महाराष्ट्र आयोजित “सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२२

गणपती स्पर्धा ३१ ऑगस्ट २०२२ (बुधवार) रोजी सुरू होईल.

टाईम महाराष्ट्र आयोजित “सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२२

"सुंदर माझा बाप्पा!" गणेशोत्सव स्पर्धा २०२२

यंदाच्या वर्षी गणेशोत्सव काहीसा रंजक बनवण्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ घेऊन आला आहे. ‘सुंदर माझा बाप्पा’ गणेश उत्सव स्पर्धा २०२२. जर तुम्ही देखील तुमच्या घरी किंवा सार्वजनिक गणेश मंडळात इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करत असाल, त्याचबरोबर इको फ्रेंडली असे डेकोरेशन (सजावट) करत असाल तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाचे आणि सजावटीचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत, खालील दिलेल्या नियमांचे पालन करून या स्पर्धेत सहज सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेचे नियम अगदी सोपे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा आणि सामाजिक भान जपलं जावं हाच आमचा उद्देश आहे. परंतु या स्पर्धेसाठी कोणीही बनावट, जुने फोटो किंवा इतरांचे फोटो पाठवू नका. तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर पुढील माहिती सविस्तर वाचा.

तुमच्या गणपती बाप्पाचा फोटो आणि ३० ते ५० सेकंदचा व्हिडिओ हा timemaharashtra या इंस्टग्राम अकॉउंटला किंवा Time Maharashtra – टाईम महाराष्ट्र या फेसबुक पेजला आम्हाला टॅग करा. आमच्या अकाउंटला टॅग करणे अनिवार्य आहे. फोटो काढताना मोबाईल आडवा धरून शूट करावे.

FaceBook Page – https://www.facebook.com/timemaharashtra

Instagram – https://www.instagram.com/timemaharashtra

हि सर्व माहिती आम्हाला खाली दिलेल्या लिंकद्वारे फॉर्म भरून पाठवा : 

“सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२२

नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

“सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२२ बक्षीस श्रेणी : 

१ ले पारितोषिक – रोख रक्कम १०,०००/- + ट्रॉफी

२ रे पारितोषिक – रोख रक्कम ७,०००/-  + ट्रॉफी

३ रे पारितोषिक –  रोख रक्कम ५,०००/-  + ट्रॉफी

आमच्याकडे ३ परीक्षांचे एक पॅनेल आहे जे बहुविध निकषांच्या आधारे पारितोषिक विजेत्यांचा निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय अंतिम मानला जाईल.

स्पर्धेच्या तारखा : 

गणपती स्पर्धा ३१ ऑगस्ट २०२२ (बुधवार) रोजी सुरू होईल.
सहभागी होण्याची आणि फोटो/व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती सबमिट करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 (गुरुवार) आहे.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच ५ ओक्टोम्बर रोजी विजेते घोषित केले जातील
एकदा निकाल घोषित झाल्यानंतर प्रत्येक सहभागींना ईमेलद्वारे सूचित केले जाईल आणि टाईम महाराष्ट्र या वेबसाईट वर देखील निकाल जाहीर केला जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा : 

Time Maharashtra

Email id – timemaharashtra@gmail.com
Whats app No – 9769612336

Exit mobile version