Tuesday, May 21, 2024

Latest Posts

ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले…महाराष्ट्राबद्दल काय म्हणाले PM MODI?

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्यामार्फत पोस्ट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रभर प्रचार सभा सुरु आहेत. प्रचार सभेला संबोधतांना नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठी भाषा बोलून करतात. त्यावेळी त्यांचे मराठी भाषेविषयीची आस्था दिसून येते.

काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट?

महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा.

मोदी सरकारने नौदलाच्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला दिले स्थान 

आपल्या भाषणादरम्यान मोदी म्हणाले, “कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या जनतेला माझा नमस्कार… मी इथे तुमचा आशिर्वाद घ्यायला आलो आहे. साताऱ्याची भूमी ही शोर्याची भूमी आहे. सातारा मध्ये भगवा फडकतच राहणार. आम्ही शिवरायांचे विचार जगण्याचा विचार करतो. इतक्या वर्षानंतर नौदलाच्या झेंड्यामध्ये इंग्रजांचे निशाण होते NDA सरकारने आणि मोदी सरकारने ते निशाण हटवले. मोदी सरकारने नौदलाच्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला स्थान दिले. असे नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या दौऱ्यावर असतांना सांगितले होते.

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss