Tuesday, May 21, 2024

Latest Posts

अनेक दिवसांचा तिढा सुटला, Shrikant Shinde आणि Naresh Mhaske यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मागील अनेक दिवसांपासून नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगताना दिसून येत होती. टाईम महाराष्ट्रने नरेश म्हस्के यांचे नाव शिवसेनेकडून निश्चित झाल्याची बातमी सर्वात आधी दिली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवसेनेकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर कल्याण-डोंबिवली मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची वर्णी लागली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्याविरोधात राजन विचारे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणूकीचं सत्र सुरु असल्याने अनेक जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. ठाण्याची जागा कोणाला मिळणार यावरुन रणधुमाळी सुरु होती पण “बालेकिल्ला” स्वत:कडे राखण्यास शिंदे यशस्वी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून “”ठाण्याची” ओळख आहे.अगदीसुरुवातीपासून भाजपचे श्रेष्ठी हे आग्रही होते आणि त्यांनी भाजपला जागा मिळेल असा देखील दावा केला होता. पण शिंदेनी तो गड आपल्याकडेच खेचून घेतल्याने महायुतीतील ठाण्याच्या जागेचा तिढा सुटला. शिवसेनेची पहिली सत्ता ज्याठिकाणी आली आणि शिंदेची होमपीच असलेल्या ठाण्यात शिवसेनेचाच उमेदवार असणार हे ठरलं. रविंद्र फाटक, मीनाक्षी शिंदे आणि प्रताप सरनाईक हे देखील इच्छुक उमेदवारांच्या यादीत होते. मात्र त्या सगळ्यांमधून बाजी मारत “नरेश गणपत म्हस्के”यांच्या नावाची वर्णी लागली आहे.

काय आहे शिवसेनेचे अधिकृत ट्विट 

लोकसभा निवडणूक – २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा!

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss