मकर संक्रातीच्या एक दिवस आधि येणाऱ्या भोगीच्या दिवशी करा बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी,आरोग्यासाठी पौष्टिक

इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण हा मकर संक्राती असतो.पण संक्रतीच्या आदल्या दिवशी भोगीचा दिवस साजरा केला जातो,त्यावेळी विशेषता लोक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी घरी बनवतात.

मकर संक्रातीच्या एक दिवस आधि येणाऱ्या भोगीच्या दिवशी करा बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी,आरोग्यासाठी पौष्टिक

इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण हा मकर संक्राती असतो.पण संक्रतीच्या आदल्या दिवशी भोगीचा दिवस साजरा केला जातो,त्यावेळी विशेषता लोक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी घरी बनवतात.महाराष्ट्रातील परंपरागत खाद्यसंस्कृतीतील पुरेपूर पोषणतत्त्व असलेल्या पदार्थांत भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी मोडतात. हे केवळ चवदारच नाही, तर पोषणतत्त्वाने भरलेले असतात व भारतीय खाद्यसंस्कृतीचा पोषक हिस्सा बनतात.जाणुन घ्या भोगीच्या भाजीचे आणि बाजरीच्या भाकरीचे आरोग्यासाठीचे फायदे

भोगीची भाजी थंडीच्या मोसमात मिळणारे विविध प्रकारचे कंद, बीन्सच्या शेंगा, गाजर-वांगी अशा फळभाज्या यांचे मिश्रण, तीळ, खोबरे, मसाले यांमुळे विविध जीवनसत्त्वे, क्षार, आहारातील फायबर पुरवते. हे पूर्णान्न बनण्यास मदत करते.

पालक-मेथीची भाजी, मिश्र भाजी यांसारखे प्रकार व उत्तरेकडे होणारे ‘सरसों का साग’सारख्या भाज्या उत्तम प्रकारचे सकस अन्न आहे. या भाज्यांतील मोहरी-जिरे, हिंग-हळद, लसूणसारखे मसाले त्यांची केवळ चव वाढवत नाहीत, तर ते ‘अॅन्टी ऑक्सिडन्ट’ व ‘अॅन्टी इन्फ्लमेटरी’ म्हणूनही काम करतात.

या भाजीबरोबर ज्वारी, नाचणी, मका, विशेषतः बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरी हे ग्लुटेनमुक्त अतिशय पोषक भरडधान्य असून लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस यासारखे सूक्ष्म पोषकतत्त्व आणि फायबर व प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. बाजरीची भाकरी व सोबत भोगीची पालेभाजी किंवा मिश्रभाजी हे चौरस अन्न बनते. भोगी बरोबर मकरसंक्रांतीला खाल्ले जातात तिळगूळ, गूळपोळी, रेवडी यासारखे पदार्थ. यांचेही पोषक स्थान आहे. गूळ व तेल-तुपाचे प्रमाण पाहता यांच्या सेवनावर खूपच मर्यादा असाव्यात. थंडीच्या मोसमात आवश्यक असणारी उष्णता शेंगदाणे, तीळ, खोबऱ्यासारख्या तेलबिया, गूळ, तेल-तूप इ. स्निग्ध पदार्थातून मिळते.या सर्व पदार्थांची थंडीच्या मोसमात शरीराला गरज असल्यामुळे अवश्य खावेत. या परंपरागत पदार्थांचा आपल्या जेवणात समावेश करून लोकांना फक्त पोषणच मिळते असे नाही तर आपली खाद्यसंस्कृतीही जतन होते.

हे ही वाचा:

मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत, ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबत शासन सकारात्मक आहे – CM SHINDE

एमएस धोनी आणि एमसी स्टेन करणार एकत्र काम,फोटो शेअर करत दिली हिंट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version