उन्हाळ्यात ‘सफरचंद दालचिनीचे’ पाणी ठरेल उपयुक्त

उन्हाळ्यात ‘सफरचंद दालचिनीचे’ पाणी ठरेल उपयुक्त

उन्हाळयात शरीर खूप थकलेले असते. काम करायला पण कंटाळा येतो. रक्ताची पातळी पण कमी-जास्त होते. (Low Bloodpressure & High Bloodpressure) कडक उन्हामुळे तुमच्या त्वचेला त्रास होतोच शिवाय डिहायड्रेशन होते. शरीराला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी हे एकमेव पर्याय आहे. पाणी प्यायला त्यासाठी कंटाळा न वाटता आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्याचे सेवन कसे केले पाहिजे याच्या काही सोप्या टिप्स आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य :-

१. २ सफरचंद
२. २ दालचिनीच्या काड्या
३. २लिटर पाणी
४. बर्फाचे तुकडे,

कृती :-

सफरचंद नीट धुऊन घ्यायचे आणि त्याचे साले काढून घ्या. त्यानंतर सफरचंदाचे बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. सफरचंदाचे तुकडे आणि दालचिनीच्या काड्या एका काचेच्या भांड्यात ठेवा. त्यामध्ये बर्फ आणि पाणी मिसळा. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये पुदिना, लिंबू घालू शकता. सर्व साहित्य नीट मिसळून २ ते ३ तास बाजूला ठेवून दया .त्या पाण्यामध्ये सफरचंद आणि दालचिनीचे घटक एकत्र होतील. आणि त्या पाण्यात चांगले घटक एकत्र होतील. दिवसभर तुम्ही ते पाणी पिऊ शकता. किंवा प्रवासात पण घेऊन जाऊ शकता.

हे ही वाचा:

उन्हाळ्यात पाणी पिऊन कंटाळा आला असेल तर ‘हे’ उपाय नक्की करून पाहा

शिवनेरीवर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकमेकांसमोर, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version