तळपत्या उन्हात रिफ्रेशिंग व्हा! करून बघा घरात Mango Mojito

आंब्याचे विविध व स्वादीष्ट प्रकार तयार करून खायला सर्वांनाच आवडतात. मुख्य म्हणजे आंब्याचा आमरस तयार करून पिणे म्हणजे जणू स्वर्ग सुखच असते.

तळपत्या उन्हात रिफ्रेशिंग व्हा! करून बघा घरात Mango Mojito

आंब्याचे विविध व स्वादीष्ट प्रकार तयार करून खायला सर्वांनाच आवडतात. मुख्य म्हणजे आंब्याचा आमरस तयार करून पिणे म्हणजे जणू स्वर्ग सुखच असते. उन्हाळ्यात आंब्यापासून तयार केलेले ज्युसेस तसेच कैऱ्यां पासून बनवलेले पन्ह प्रत्येकालाच ताजेतवाने करतात. परंतु सारखे सारखे तेच पिणे कधी कधी कंटाळवाणे होते. उन्हाळ्यात जवळपास प्रत्येकजण आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतो. परंतु या पारंपरिक नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त आंब्यापासून काही वेगळ्या व हटके रेसिपीज ही बनवता येतात.लहान मुलांना आंब्यांपासून बनवलेल्या हटके रेसिपीज जास्त आकर्षित करतात. त्याचप्रमाणे मोठ्यांना ही जरा हटके व नवीन पदार्थ खायला आवडतात. तसेच कडाकाच्या उन्हाळ्यात ज्युसेस,थंडपेय पिल्याने आपल्याला रिफ्रेशिंग वाटते. यातच जर थंडपेय व ज्युस आंब्याचा असेल तर त्याची मज्जाच वेगळी असते.चला तर मग जाणून घेऊया आंब्यापासून बनवलेल्या या हटके ज्युसची म्हणजेच Mango Mojito ची रेसिपी.

Mango Mojito बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

आंब्याचे तुकडे
क्लब सोडा (चवीनुसार)
पुदिन्याची पाने (गार्निशिंगसाठी )
लिंबाचा रस – १/२
साखरेचा पाक – २ चमचे साखर
बर्फ ( आवश्यकतेनुसार )
मीठ (चवीनुसार)

Mango Mojito कृती –

Mango Mojito बनवण्या साठी सर्वात प्रथम ब्लेंडरमध्ये, आंब्याचे ताजे तुकडे टाकून एक गुळगुळीत प्युरी तयार करून घ्यावी. एक ग्लास घेऊन त्यात ६ पुदिन्याची पाने, अर्धा लिंबाचा तुकडा, तसेच लिंबाचा रस आणि साखरेचा पाक टाकून एकत्र करावे.दुसऱ्या ग्लास मध्ये देखील पुदिन्याची पाने, लिंबाचा तुकडा तसेच लिंबाचा रस आणि साखरेचा पाक एकत्र करून घ्यावे. आता दोन्ही ग्लास मध्ये तयार केलेली आंब्याची प्युरी अर्धी अर्धी टाकावी व बर्फ आणि सोडा घालून मिक्स करावे. अशा प्रकारे आपला हटके Mango Mojito पिण्या साठी तयार आहे.

हे ही वाचा : 

शरीरातील रक्त वाढवण्यासाठी ‘या’ ज्यूसचे करा सेवन, झटपट वाढेल Hemoglobin

शरद पवार यांनी अहमदनगरमधून कोणाला लगावला टोला ?

RCB vs GT, आरसीबी प्लेऑफचे स्वप्न होणार का साकार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version