Sunday, June 4, 2023

Latest Posts

शरीरातील रक्त वाढवण्यासाठी ‘या’ ज्यूसचे करा सेवन, झटपट वाढेल Hemoglobin

सध्या अनेकांच्या शरीरात रक्त कमी असण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विविध गोळ्या,औषध घेऊन सुद्धा या समस्यांचे विवरण काही होत नाही.

सध्या अनेकांच्या शरीरात रक्त कमी असण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विविध गोळ्या,औषध घेऊन सुद्धा या समस्यांचे विवरण काही होत नाही. अनेक वेळा हेल्दी डाएट(Healthy Diet) किंवा डॉक्टरांनी सजेस्ट(Doctors Suggetion) केलेले डाएट घेऊन सुद्धा शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढत नाही. अशा परिस्थितीत लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. शरीरात लोहाची कमतरता असल्यास रक्त पेशींचे (Blood Cells) उत्पादन देखील कमी होते. शरीरात लोह, फॉलिक ऍसिड (Folic acid) आणि व्हिटॅमिन बी (Vitamin B) च्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन (Hemoglobin) लेवल कमी होते.शरीरातील रक्त म्हणजेच Hemoglobin कमी झाल्याने थकवा जाणवू लागतो. तसेच कालांतराने एनिमिया (Anemia) ची सुद्धा समस्या उद्भवते. एवढेच नाहीतर रक्ताच्या कमतरतेमुळे व्यक्ती कोमात सुद्धा जाऊ शकते. या शिवाय डोकेदुखी, अशक्तपणा-थकवा, छातीत दुखणे, निद्रानाश, धाप लागणे किंवा चक्कर येणे या आजारांना देखील तोंड द्यावे लागते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण म्हणजेच हिमोग्लोबिन योग्य राखणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेउया कोणत्या घरगुती सरबताने आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य राहील.

सरबत बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

डाळींब – १
बीट – १
गाजर – १
खजूर – ५ ते ६

सरबत बनविण्याची कृती –

बीट हे फळ लोहाचे सर्वोत्तम स्रोत आहे. एका बाउलमध्ये डाळींब सोलून त्याचे दाणे काढून घ्यावे. त्यात बीट आणि गाजराचे लहान लहान तुकडे घालून हे सर्व एकत्र करून घ्यावे. एकत्र केलेलं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात ५ ते ६ खजूर घालून मिक्सरमध्ये हे मिश्रण बारीक करावे. बारीक झालेले हे मिश्रण एका गाळणीने किंवा कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने गाळून ग्लासमध्ये ओतावे. अशाप्रकारे तयार झालेला लोहयुक्त सरबत नियमित प्यायल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढेल तसेच या सरबताने आपले स्वास्थ ही चांगले राहील.

हे ही वाचा : 

रोहित पवार यांनी साधला प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

अरविंद केजरीवाल मुंबईमध्ये येऊन भेटणार कोणाला ???

राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना देखील घेतले धारेवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss