Thursday, May 2, 2024

Latest Posts

शरद पवार यांनी अहमदनगरमधून कोणाला लगावला टोला ?

हमाल माथाडी कामगारांच्या २१ व्या अधिवेशनाचे आज अहमदनगर येथे उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माथाडी कामगार आणि हमालांचे नेते दिवंगत शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले.

हमाल माथाडी कामगारांच्या २१ व्या अधिवेशनाचे आज अहमदनगर येथे उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माथाडी कामगार आणि हमालांचे नेते दिवंगत शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. याप्रसंगी शरद पवार म्हणाले, ज्यांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा माथाडी आणि हमाल या क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्हा लोकांसाठी दिला ते लोकनेते शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. शंकरराव व त्यांचे सहकारी आम्ही अनेक वर्षे एकत्र येऊन काम केले. असं शरद पवार यांनी सांगितले. कष्टकऱ्यांमधून आलेले नेतृत्व, २५ वर्षे नगरसेवक, सात वर्षे या अहमदनगरचे नगराध्यक्ष आणि अनेक वर्षे माथाडी कामगारांसाठी खस्ता खाणारा नेता म्हणून शंकररावांची ओळख सगळ्यांना आहे. अशी ओळख देखी यावेळी त्यांनाही त्यांच्या भाषणातून करून दिली.

या ठिकाणी हमाल माथाडी महामंडळाचे अधिवेशन भरलं आहे. अनेक कायदे देखील त्यावेळी करण्यात आलेत. कारखानदारी वाढली, दरवर्षी ती वाढते. अनेक हातांना त्यामुळे काम मिळत गेले. ते काम देत असताना जो काम करणारा आहे त्याला कायद्याने संरक्षण आहे. पण या कायद्याच्या संरक्षणावर हल्ला करण्याचे काम काही लोकांनी सुरू केलं आहे. माथाडी हमाल कायदा या देशामध्ये महाराष्ट्रात सुरू झाला आणि आज या कायद्याने कष्टकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली. ज्या देशाला सरकार पुन्हा ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जात-धर्म यावरुन सामान्य लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याची एकही संधी सोडत नाही. आज ज्या राजकीय पक्षाच्या हातात देशाची सत्ता आहे ती सत्ता कष्टकरी लोकांसाठी, समाजातील लहान घटकांसाठी वापरायची समज या राजकर्त्यांना नाही आहे.असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. जातीच्या आणि धर्माच्या नावाने समाजात तेढ निर्माण केली जात आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर होऊन गेले. दोन दिवस झाले या जिल्ह्यात बाजारपेठ बंद आहे, जातीजातीमध्ये अंतर वाढवणे, संघर्ष वाढवणे हे जाणूनबूबाजूं केले जात आहे असे देखील शरद पवार म्हणाले.

परंतु आज काही लोक असे आहेत की त्यांना माथाडी कायदा खुपतो आहे. आज मालक वर्गाची एक मानसिकता वेगळी झाली आहे. माथाडी कामगारांवर हल्ला करणे, त्यांना दुर्बल बनवणे ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे. आज हा कायदा सुखासुखी झाला नाही. शरद पवार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत एक गोष्ट शेअर आलेली आहे, ते म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेत मी नुकताच निवडून गेलो होतो. यावेळी अण्णासाहेब पाटील, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अशा अनेकांनी शक्ती पणाला लावली. मग गिरणी कामगार, माथाडी कामगार या सगळ्या लोकांची शक्ती तयार केली आणि त्यांच्यासाठी कायदा तयार करण्याचा निकाल घेतला. आणि आजहि या कायद्यामुळे तुमच्या सारख्या कष्टकऱ्यांना त्याचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

शरद पवार यावेळी म्हणाले, मध्ये सरकार बदललं आणि फडणवीस यांचे सरकार आले. त्यांनी काय केले तर या राज्यातील ३६ जिल्हे एकत्र करून एक नवीन राज्यव्यापी मंडळ स्थापन करण्याची भूमिका घेतली. त्या कायद्याला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आजही तो कायदा काही प्रमाणात शिल्लक आहे. काही जण असं सांगतात की, इथे गुंडगिरी आहे, इथे पैसे लुबाडण्याचं काम होतं. मी बाबा आढावांना ५०-६० वर्षे ओळखतो. उभ्या आयुष्यामध्ये कुणी गुंडेगिरी केली, कोणी पैसे लुबाडण्याचे काम केले तर बाबा आढाव कधीही त्यांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत व त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. गुंडगिरीचा आरोप करून सबंध माथाडी चळवळीला एक प्रकारे बदनाम करण्याचे काम काही लोकं करत आहे असा टोला विरोधकांचे नाव न घेता शरद पवार यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

वानखेडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर २२ मे रोजी सुनावणी होणार

राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना देखील घेतले धारेवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss