‘या’ फळाचं लोणचं तुम्ही कधी ट्राय केलंय का?

‘या’ फळाचं लोणचं तुम्ही कधी ट्राय केलंय का?

जांब (Rose Apple) या फळाची अंदमान आणि निकोबार बेट येथे लागवड केली जाते. हे फळ दिसायला शिमला मिरची सारखे असते. या सफरचंदामध्ये कमी कॅलरी असतात. हे फळ हलक्या हिरव्या आणि पिवळ्या रंगामध्ये पण असते. या फळाला जाम, जावा सफरचंद, वॅक्स एप्पल इत्यादी नावाने ओळखले जाते. फळांचा गर हा खुसखुशीत आणि कुरकुरीत असतो. या फळापासून जॅम आणि जेली तयार करतात. पण कधी लोणचं बनवलं आहे का? चला तर मग जाणुन घेऊयात जांबच्या लोणच्याची रेसिपी.         

साहित्य –                                   

जांब
मोहरी
गुळ
लाल तिखट
लसुण
कढीपत्ता

कृती

सर्वप्रथम जांब स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर जांबचे मध्यम तुकडे करा. नंतर गॅसवर भांडे ठेवा. त्यामध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यामधे मोहरी, कढीपत्ता, लसुण, लाल तिखट टाका. त्यामध्ये माध्यम आकाराचे केलेले जांबचे तुकडे टाकून एकत्र करा. नंतर त्यामध्ये गुळ टाका. गुळ टाकून एकत्र करून घ्या. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. लोणचे चांगले एकत्र मिसळत राहा. चांगले घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. तयार आहे आंबट गोड जांबच लोणचं. हे लोणचे एका बरणीमध्ये भरून स्टोर करून ठेवू शकता. चपातीसोबत नाश्तामध्ये खाऊ शकता.

हे ही वाचा:

उन्हाळयात बनवा आंबट गोड कैरीचे वरण

“परंपरा” च्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

 

Exit mobile version