Thursday, May 2, 2024

Latest Posts

उन्हाळयात बनवा आंबट गोड कैरीचे वरण

उन्हाळयात कैरी खायला सर्वांनाच आवडते. आंब्यात आणि कैरीत फरक असतो. आंबा थोडा मोठा आणि कैरी थोडी लहान असते. चवीला कैरी ही आंबट असते. कैरीचे पन्हे पण चविष्ट लागते. उन्हाळयात कैरी खाल्यावर शरीराला खुप फायदे होतात. इतर फळांपेक्षा कैरीमध्ये साखर जरा कमी असते. आमटी बनवण्यासाठी कैरीचा वापर करू शकता. नेहमीच जेवणात तिखट डाळ किंवा गोड वरण खात असतो. पण कधी कैरी टाकून वरण बनवलं आहे का? चला तर जाणून घेऊयात कैरीच्या आंबट गोड वरणाची रेसिपी.

साहित्य

तुरीची डाळ
कैरी
हिरव्या मिरच्या
गुळ
मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
मोहरी कढीपत्ता आणि हिंग
हळद

कृती

सर्वप्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घ्या. कैरीसुद्धा चांगली धुऊन सोलून घ्या. त्याचे बारीक तुकडे करून कुकरच्या डब्यामध्ये बारीक केलेली कैरी आणि तुरीची डाळ, हळद टाकून उकडून घ्या किंवा २ शिट्या काढून घ्या. त्यानंतर फोडिणीसाठी एक पातेलं गॅसवर ठेवा. त्या पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी द्या. नंतर त्यामध्ये कैरी आणि उकडलेली डाळ टाका. जाड पातळ हव्या त्याप्रमाणात पाणी टाकून एकत्र करा. नंतर त्यामध्ये गुळ आणि चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढा. उकळी येत असताना त्यामध्ये कोथिंबीर टाका. तयार आहे कैरीची डाळ. गरम भाताबरोबर सर्व्ह करा.

 

हे ही वाचा:

‘ऑरेंज कॅपच्या’ स्पर्धेतदेखील किंग कोहली अव्वल

आंब्याची कुल्फी तर खूप आवडते पण बनवायची कशी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss