Monday, May 20, 2024

Latest Posts

दावोसला गुलाबी थंडीत काय केले लोकांना सांगावे, Sheetal Mhatre यांचा Priyanka Chaturvedi यांना सवाल

शिवसेना उबाठा गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त विधान केले. त्यावरून, आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळत आहे.

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर वादग्रस्त विधान केले. त्यावरून, आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळत आहे. आता, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, “कुठलेही कतृत्व नसताना, शिवसेनेशी संबंध नसताना प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदारकी मिळवली,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, “प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदारकी कशी मिळवली, हे लोकांना सांगितले पाहिजे. मराठीचा गंध नसताना, कुठलेही कतृत्व नसताना इतकेच काय शिवसेनेशी संबंध नसताना चतुर्वेदी तुम्ही खासदारकी मिळवली. आता खासदारकीची टर्म संपत असताना तुमची जी काही तफफड सुरु आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसते आहे. बुलंदी सिनेमातला एक डायलॉग आहे ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मुंह में हाथ डालने’ अशीच काहीशी परिस्थिती प्रियंका चतुर्वेदी यांची झाली आहे. तुमचा काही संबध नसताना दावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले हेही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

उत्तर पूर्व मुंबई येथील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रियांका चतुर्वेदी यांनी महायुतीवर जोरदार टीका केली यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “गद्दार गद्दारही रहेगा! दिवार नावाचा एक चित्रपट आलेला… त्यात अमिताभ बच्चनच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं लिहिलेलं असत. पण यांच्या कपाळावर ‘मेरा बाप गद्दार है’ असं लिहिलंय.. मी यावर जास्त काही बोलणार नाही,” असे त्या म्हणाल्या होत्या. यावरून शिंदेगटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून अनेक नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

हे ही वाचा:

Priyanka Chaturvedi वैफल्यग्रस्त झाल्यात, CM Eknath Shinde यांच्यावरच्या टिकेनंतर Manisha Shinde आक्रमक

Eknath Shinde आणि Ajit Pawar यांना BJP कवडीची किंमत देत नाही – Bhaskar Jadhav

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss