होळी सणानिमित्त लुसलुशीत पुरणपोळी कशी करावी, या काही खास टिप्स

होळी (Holi २०२४) सणाचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे.

होळी सणानिमित्त लुसलुशीत पुरणपोळी कशी करावी, या काही खास टिप्स

होळी (Holi २०२४) सणाचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. सगळीकडे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच होळी खेळातात. होळी म्हंटल की पुरणपोळीचा सण. यादिवशी सगळीकडे पुरणपोळी बनवली जाते. होळीचे विशेष महत्व म्हणजे दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हे या सणाचे महत्व आहे. पण अनेकदा पुरणपोळी बनवायची म्हंटल की डाळ नीट शिजेल कि नाही, मैदा नीट भिजला जाईल कि नाही असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य:-

१ वाटी चणा डाळ
१ वाटी गूळ
१ वाटी मैदा
तेल
वेलची पावडर

कृती:-

सर्वप्रथम पुरणपोळी बनवण्यासाठी १ वाटी डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये डाळीच्या अडीचपट पाणी टाकून डाळ नीट शिजवून घ्या. डाळ शिजवून झाल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या.या पाण्यापासून तुम्ही आमटी बनवू शकता. त्यानंतर डाळीतील पाणी निथळून झाल्यावर त्यात किसलेला गूळ घाला. कुकर गॅसवर ठेवून पुन्हा एकदा डाळ आणि गूळ नीट आटवून घ्या. हे मिश्रण आटवून घेत असताना सतत ढवळत राहा. त्यामुळे डाळ भांड्याला चिकटणार नाही. त्यानंतर मिश्रणात १ चमचा वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करून मिश्रण गरम असताना पुरण यंत्रातून फिरवून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यनंतर नीट वाटले जात नाही. मैद्याच पीठ भिजवण्यासाठी एका ताटात एक वाटी मैदा चालून घ्या. नंतर त्यात ४ ५ चमचे तेल, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. हे पीठ सैलसर मळून घ्या. मळून झाल्यावर २ तास झाकून ठेवा.

पुरणपोळी बनवण्यासाठी पुरणाचे दीड इंचाचे गोळे बनवून घ्या. आणि मैद्याच्या पिठाचे अर्धा इंचाचे गोळे बनवून घ्या. मैद्याच्या पिठात पुरणाचा गोळा भरून झाल्यावर चारही बाजूने बंद करून नीट गोळा बनवून घ्या. त्यानंतर मैदा लावून पुरणपोळी लाटून घ्या. लाटून झाल्यानंतर गरम तव्यावर पुरणपोळी दोन्ही बाजूने नीट खरपूस भाजून घ्या. त्यानंतर वरून तूप लावा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये पुरणपोळी..

हे ही वाचा:

मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ‘अशी’ असणार विशेष सुविधा

राजकारणाची पातळी खालावली आहे; जितेंद्र आव्हाडांनी केला अजित पवारांवर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version