Sunday, April 28, 2024

Latest Posts

मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ‘अशी’ असणार विशेष सुविधा

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे, पोस्टर, ऑडियो-व्हिडियो, संदेश यांचे पुर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम पूर्वप्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीचे कामकाज सुरु आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदार मार्गदर्शिका तयार केली आहे. सदर मार्गदर्शिका राज्यातील प्रत्येक कुटूंबाना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वाटप करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने एकूण दोन कोटी ७२ लाख ४० हजार मार्गदर्शिका वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठी दोन कोटी १७ लाख ९२ हजार, हिंदी ४०  लाख ८६ हजार व इंग्रजी १३ लाख ६२  हजार भाषेतील मतदार मार्गदर्शिका छपाई करुन त्याचे वाटप करण्याबाबत संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांना आदेश देण्यात आले आहेत. याबाबत मार्गदर्शिकेची छपाई करुन जिल्ह्यांना वाटप करण्याची कार्यवाही संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत सुरु असल्याची माहिती  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मतदानादिवशी सुट्टीबाबतचा शासन निर्णय

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबतची अधिसुचना निर्गमित करण्यासाठी संबंधित विभागास कळविण्यात आलेले असून कामगारांसाठी मतदानादिवशी सुट्टीबाबतचा शासन निर्णय २२ मार्च रोजी उद्योग विभागाने निर्गमित केलेला आहे. गृह विभागाकडून कोरडा दिवस जाहिर करण्याबाबतची व सामान्य प्रशासन विभागाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

 

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सोय 

८५ वर्षावरील वरिष्ठ नागरीक तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले मतदार यांना त्यांची इच्छा असल्यास गृह मतदान सुविधा राज्यातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूकांमध्ये प्रथमच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तथापि, त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. मात्र, गृह मतदानाच्या सुविधेसाठी अर्ज केल्यास त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली.

हे ही वाचा:

विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर घेणार ‘या’ मोठ्या नेत्याची भेट

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss