लहान मुलांच्या आवडीची चॉकलेट बनाना स्मूदी

लहानमुलांना आवडीची गोष्ट म्हणजे चॉकलेट मुलांना नेहमीच चॉकलेट खायला आवडतात.

लहान मुलांच्या आवडीची चॉकलेट बनाना स्मूदी

लहानमुलांना आवडीची गोष्ट म्हणजे चॉकलेट मुलांना नेहमीच चॉकलेट खायला आवडतात. १ ते ५ वर्ष गटातल्या मुलांना जंकफुडकडे आकर्षित होतात.त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. मुलांच्या मानसिक आणि शारीरिकसाठी विकासासाठी हा योग्य काळ आहे. त्यामुळे त्यांना या वयात पोषक आहार देणं गरजेचं आहे. रोजरोज लहानमुलांना चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो. चवीला उत्तम आणि मुलांना खायला कंटाळा पण येणार नाही अशी रेसिपी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

साहित्य:-

१ केळी
१ फुल कप क्रीम दुध
२ चमच कोको पावडर
१ चमच मध
१ चमच अक्रोडची पुड

कृती:-

सर्वप्रथम १ केळी, १ फुल कप क्रीम दुध,२ चमच कोको पावडर,१ चमच मध,१ चमच अक्रोडची पुड, यांना ब्लेंडर मध्ये टाकून बारीक लिक्विड करून घ्या. एका ग्लासाला चॉकलेट सिरीप लावून फ्रिज मध्ये थोडावेळ थंड करायला ठेवा. त्यानंतर त्याच ग्लासमध्ये चॉकलेट केळी स्मुदी सर्व्ह करा. मुलांना आकर्षित करण्यासाठी चॉकलेट केळी स्मुदी वरती बेरीज टाका. १ ते ५ वयातल्या मुलांना रंगांचे खूप आकर्षण असते. त्यामुळे तुम्ही त्यांना रंगीबिरंगी स्प्रिंकल,चॉकलेट सिगार ने डेकोरेट करून देऊ शकता.

हे ही वाचा:

नाश्तासाठी बनवा हिरव्या मूगाचे पराठे.

ठाकरी विचारांचा वारसा मी जपेन, कारण माझे बाबा…काय म्हणाले Amit Thackeray?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version