Saturday, April 27, 2024

Latest Posts

ठाकरी विचारांचा वारसा मी जपेन, कारण माझे बाबा…काय म्हणाले Amit Thackeray?

माझ्या वडिलांमुळे माझं अक्षर छान झालं, त्यामुळे ते बक्षीस नेहमीच स्पेशल आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना २०२४ चा ‘झी युवा सन्मान २०२४’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या अमित ठाकरे यांच्यासह उपस्थित होत्या. यासोबत, अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॉन्टेन्ट क्रिएटर अथर्व सुदामे यांनी अमित ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी अमित  ठाकरे यांनी राजकारणाविषयी केलेल्या भाष्याबद्द्ल सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसून येत आहे. 

समाजकारणाला-राजकारणाला नवी दिशा देऊ

तरुणाईला माझं इतकंच सांगणं आहे की, आरोप-प्रत्यारोपांच्या बातम्यांमधून बाहेर या. लोकांसाठी गाडून घेऊन काम करा आणि संयम, प्रामाणिकपणा जपा… निश्चित सांगतो, आपण सर्व मिळून समाजकारणाला-राजकारणाला नवी दिशा देऊ, असे मत मुलाखतीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केले. माझ्याकडे आलेला ठाकरी विचारांचा वारसा मी नक्की जपेन. कारण त्याबाबतीत माझे बाबाच माझे आदर्श असल्याचे अमित  ठाकरे यांनी सांगितले. 

अमित ठाकरे चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार का?

पूर्वी जे लोकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं, आज ते हरवलंय. ते समाधानाचे दिवस परत आणण्यासाठी मी समाजकारणात-राजकारणात काम करतोय, असेही मुलाखतीत अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. बक्षीसाबाबत प्रश्न विचारला असता, अमित ठाकरे यांनी सांगितले की, शाळेत असताना मला सुंदर हस्ताक्षराबद्दल बक्षीस मिळालं होतं. माझ्या वडिलांमुळे माझं अक्षर छान झालं, त्यामुळे ते बक्षीस नेहमीच स्पेशल आहे. मी आताच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा एक जाणवलं की, ग्रामीण असो वा शहरी तरुणाई त्यांना त्यांचे फक्त मूलभूत प्रश्न सोडवून हवे आहेत. असे अमित ठाकरे तरुणांच्याबाबतीत म्हणाले. यासोबतच, अमित ठाकरे चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार का? या प्रश्नावर उत्तर देत अमित ठाकरे म्हणाले की, महेश मांजरेकर यांनी चित्रपटासाठी काम करणार का? अशी विचारणा केली होती. पण त्यावेळी ते शक्य होऊ शकलं नाही, पण मला कॅमेऱ्याच्या मागे किंवा कॅमेऱ्याच्या समोर काम करायला आवडेल कारण; तीच माझी आवड आहे. म्हणून पुढे संधी निर्माण झाली तर मी ते नक्की करेन, असे अमित ठाकरे यांनी सांगितले. 

हे ही वाचा:

विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर घेणार ‘या’ मोठ्या नेत्याची भेट

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss