घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आलेपाक वड्या

भारतामध्ये प्रामुख्याने चहामध्ये आल्याचा वापर केला जातो.

घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आलेपाक वड्या

भारतामध्ये प्रामुख्याने चहामध्ये आल्याचा वापर केला जातो. आल्याचा वापर चहा मध्ये केल्याने चहाची चव वाढते. मात्र आलं खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आल्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळून येतात. कच्च्या आल्यामध्ये व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन डी, आयर्न, झिंक आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आल्याचा रोजच्या आहारात वापर केल्याने जेवणाची चव वाढते. तसेच अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. मात्र काही लोकांना आल्याचा चहा आवडत नाही. अश्यावेळी आपण घरी आल्याच्या वड्या नक्कीच बनवू शकतो. आल्याच्या वड्या बनवण्यासाठी देखील सोप्या आहेत. चला तर पाहुयात रेसिपी..

साहित्य:-

१ कप चिरलेले आले
१ वाटी गूळ
१ टेबलस्पून ज्येष्ठमध

कृती:-

सर्वप्रथम आल्याची वडी बनवण्यासाठी चिरलेल्या आलं आणि गुळाची एकत्र पेस्ट बनवून घ्या. पेस्ट बनवून घेतल्यानंतर ही पेस्ट एका कढईमध्ये ओतून घ्या. पेस्ट गॅसवर गरम करून पेस्ट आटवून घ्या. त्यानंतर त्यात ज्येष्ठमध घालून मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर एका ताटाला तूप लावून सगळीकडे मिश्रण पसरवून घ्या. त्यानंतर ते थंड झाल्यावर त्याच्या लहान आकाराच्या वड्या पाडून घ्या. वड्या पूर्ण थंड झाल्यानंतर बंद डब्यात वड्या भरून ठेवा. तयार आहेत आल्याच्या वड्या…

हे ही वाचा:

“महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक,गुजरातमध्ये एकाच टप्प्यात किरण मानेची लक्षवेधी पोस्ट

आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version