Tuesday, May 14, 2024

Latest Posts

आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल

निवडणूक आयोगाकडून काल निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

निवडणूक आयोगाकडून काल निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर शनिवारपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील पहिला आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये मुखेड विधानसभा मतदारसंघात (Mukhed Assembly Constituency) निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेंडी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एल.जे. जाधव यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नांदेड़चे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नांदेडच्या मुखेड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत मुखेड विधानसभा मतदारसंघात झोन क्रमांक २५ निवळीकरिता क्षेत्रीय अधिकारी म्हणून एल. जे. जाधव यांची नियुक्ती केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्येक्षतेखाली २ फेब्रुवारी रोजी नियोजन भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये एल. जे. जाधव यांनी रजा घेतली. त्यामुळे त्यांना कारण दाखवण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी जाधव यांना अनेकवेळा दूरध्वनीद्वारे निवडणूक संबंधीचे कामकाज करण्याबाबत सूचना देखील देण्यात आल्या होत्या. त्यांनी निवळी येथील मतदान केंद्र तपासणी अहवालही सादर केला नाही. त्यामुळे त्यांचा आवाहल वरिष्ठांना देण्यात आला नाही. त्यानंतर जाधव यांना अंतिम नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांच्यावर निवडणूक संबंधाने दिलेले कर्तव्य न करता निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याने नायब तहसीलदार अशोक लबडे यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

निवडणूक आयोगाकडून शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या जाहीर करण्यात आल्या. तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये ५ टप्प्यात मतदान होणार आहे. त्यातच आता आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यामध्ये आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा नांदेड मध्ये नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

बीड जिल्ह्यातील सभेदरम्यान मनोज जरांगे यांच्यावर पाच गुन्हे दाखल, जरांगेंच्या अडचणीत वाढ

‘कुण्या राजाची तू गं राणी’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप,गुंजा-कबीरने शेअर केली भावूक पोस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss