उन्हाळ्यात बनवा आंबट गोड कैरीचे पन्हे

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात सगळीकडे कैरी उपलब्ध होते.

उन्हाळ्यात बनवा आंबट गोड कैरीचे पन्हे

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात सगळीकडे कैरी उपलब्ध होते. कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या काहीतरी थंड पिण्याची आणि खाण्याची इच्छा होते. अश्यावेळी आपण दुकानातून एखादा ज्यूस किंवा सरबत घेऊन येतो. पण या उन्हळ्याच्या दिवसात तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये कैरीचे पन्हे बनवू शकता. कैरीचे पन्ह बनवण्यासाठी देखील सोपे आहे. चला तर पाहुयात रेसिपी..

साहित्य:-

२ कैरी
१ वाटी गूळ
१ चमचा वेलची पावडर
१ चमचा चाट मसाला
१ चमचा मीठ

कृती:-

सर्वप्रथम कैरीचे पन्हे बनवण्यासाठी कैरी कुकरमध्ये उकडून घ्या. त्यानंतर कैरी थंड झाल्यावर साल काढून गर काढून घ्या. गर काढून झाल्यानंतर त्यात साखर, चवीनुसार वेलची पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सस करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर पन्ह एका बरणीमध्ये भरून ठेवा. तुम्हाला ज्यावेळेस पन्ह बनवायचं असेल तेव्हा २ ते ३ चमचे गे गर एका ग्लासात घेऊन त्यात १ ग्लास पाणी टाकून मिक्स करून तुम्ही पिऊ शकता.

हे ही वाचा:

मोदींनी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवले, पण ते जास्त दिवस तुरुंगात राहू शकत नाही; सुनीता केजरीवाल यांनी दिली प्रतिक्रिया

संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, रामलीला मैदानातून शरद पवारांनी केले नागरिकांना आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version