दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांआधी ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटके विरोधात आज दिल्लीमध्ये लोकशाही बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजीरवाल उपस्थित होत्या.आज दिल्लीमध्ये सर्व विरोधी पक्षनेते उपस्थित होते.ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यंमत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आयोजित करण्यात आलेल्या सभेत सर्व नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. या रॅलीमध्ये सुनीता केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
सुनीता केजरीवाल म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझे पती अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवले आहे. हे त्यांनी योग्य केले आहे का? हे भाजपावाले म्हणतात अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पण त्यांना हे माहित नाही की आमचे केजरीवाल शेर आहेत. ते जास्त दिवस त्यांना तुरुंगात ठेवू शकणार नाहीत. करोडो लोकांच्या हृदयामध्ये अरविंद केजरीवाल आहेत. अनेकदा मला वाटत की, स्वातंत्र्याच्या लढ्यात ते एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि देशासाठी लढता लढता शहिद झाले. या जन्मातही त्यांना भारत मातेसाठी संघर्ष करण्यासाठी पाठवण्यात आले आहे, असे सुनीता केजरीवाल म्हणाल्या.
दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सोनिया गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेते उपस्थित होते. काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या सभेमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची आधार देऊन विचारपूस केली. आयोजित करण्यात आलेल्या या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
हे ही वाचा:
शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये, संजय शिरसाटांनी केली गिरीश महाजनांवर टीका
Follow Us