Friday, May 17, 2024

Latest Posts

संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, रामलीला मैदानातून शरद पवारांनी केले नागरिकांना आव्हान

आज दिल्लीतील राम लीला मैदानात विरोधी पक्षनेत्यांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.

आज दिल्लीतील राम लीला मैदानात विरोधी पक्षनेत्यांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांआधी ईडी कडून अटक करण्यात आली आहे. यालाच विरोध करण्यासाठी आज दिल्लीमध्ये लोकशाही बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरद पवार यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी उपस्थित होत्या. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. यालाच विरोध करण्यासाठी सर्व विरोध पक्ष नेते दिल्लीमध्ये उपस्थित होते. या रॅलीमध्ये सर्वच विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात आली.

दिल्लीमधील राम लीला मैदानात आज लोकशाही बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना धमकावण्यात आले, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असो , अन्य मुख्यमंत्री असो, त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम हे सरकार करत आहे.अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना केलेली अटक म्हणजे संविधानावर हल्ला आहे. ही कारवाई लोकशाहीवर हल्ला आहे, असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी आपल्याला संविधान दिले आहे. ते संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. संविधानाविरोधातील शक्तींना आपल्याला रोखायचे आहे. आता देशात निवडणुका सुरु झाल्या आहेत. या निवडणुकीत मतदान केंद्रावर तुम्ही जाल तेव्हा लक्षात ठेवा की, भाजपच्या विरोधात मतदान करायचं आहे. भाजपच्या साथीदारांची विरोधात मतदान करायचं आहे,असे आव्हान शरद पवार यांनी नागरिकांना दिले आहे.

माझ्या देशातील नागरिक हे घाबरणारे नसून लढणारे आहेत. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ईडी, सीबीआय, आयटी डिपार्टमेंट भाजपचे तीन साथी पक्ष आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यामागे ईडी लावून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, हेमंत सोरेन यांच्यावर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकले. ही कोणती पद्धत आहे अटक करण्याची,असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना पक्षात घेत त्यांच्यावरचे आरोप पुसून टाकण्यात आले. आता त्यांचे ४०० पारचे स्वप्न आहे. एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक आहे.त्यामुळे आता हे सरकार पाडण्याची वेळ आली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये, संजय शिरसाटांनी केली गिरीश महाजनांवर टीका

विकसित भारताच्या निर्मितीमध्ये रत्न आभूषण निर्यात क्षेत्राची भूमिका मोठी- Mukesh Ambani

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss