सोप्या पद्धतीने बनवा आंबड गोड पेरूची चटणी

पेरू (Guava) हे फळ चवीला आंबट गोड असत.

सोप्या पद्धतीने बनवा आंबड गोड पेरूची चटणी

पेरू (Guava) हे फळ चवीला आंबट गोड असत. भारतामध्ये पेरूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. याला जाम किंवा अमरूद असे देखील बोलले जाते. यामध्ये आवळ्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असतात. त्यामुळे थंडी किंवा इतर दिवसांमध्ये होणाऱ्या आजारांपासून वाचता येते. पेरूमध्ये व्हिटॅमिन बी ३ आणि व्हिटॅमिन बी ६ आढळून येतात ज्यामुळे मेंदूमध्ये रक्त परिसंचरण सुधारतात आणि तुमच्या मज्जातंतूंना आराम मिळतो. यामध्ये आढळून येणाऱ्या कॉपरमुळे हार्मोन्सचे उत्पादन आणि शोषणासाठी आवश्यक असते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी रोजच्या आहारात पेरूचे सेवन केले पाहिजे. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे दोन्ही गुणधर्म महत्वाचे असतात. पण तुम्हाला जर नुसता पेरू खाण्यासाठी आवडत नसेल तर तुम्ही पेरूची चटणी घरी बनवू शकता. चला तर पाहुयात रेसिपी…

साहित्य:-

२ पेरू , कोथिंबीर, पुदिना, ३-४ हिरव्या मिरच्या, आले, जिरे, चाट मसाला, मीठ, जिरे पावडर आणि लिंबू.

कृती:-

सर्वप्रथम पेरूची चटणी बनवण्यासाठी पेरू स्वच्छ धुवून पेरूचे चार भाग कापून घ्या. त्यानंतर त्यातील बिया काढून पेरू छोट्या किसणीवर किसून घ्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, थोडेसे आले, जिरे, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार चाट मसाला टाकून जाड बारीक चटणी मिक्सर मधून वाटून घ्या. वाटून झाल्यानंतर वरून पाणी आणि थोडासा लिंबाचा रस पिळून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे पेरूची चटणी..

हे ही वाचा:

संजय राऊतांनी पुन्हा एकदा साधला शिंदेंवर निशाणा; गुलामांना काय आवाज असतो का?..

शिवनेरीवर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकमेकांसमोर, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version