Saturday, April 27, 2024

Latest Posts

संजय राऊतांनी पुन्हा एकदा साधला शिंदेंवर निशाणा; गुलामांना काय आवाज असतो का?..

मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून अनेक मतभेद सुरु आहेत.

मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून अनेक मतभेद सुरु आहेत. त्यामुळे शिंदे गटात भाजप बरोबर मोठी नाराजी आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) निशाणा पाठवला आहे. संजय राऊत म्हणाले, गुलामांना काय आवाज असतो का? स्वाभिमानी लोक आवाज उठवू शकतात, ज्यांनी ५० कोटी रुपये घेऊन स्वतःचा ईमान विकला आहे, त्यांनी तिकिटासाठी भांडण करू नये, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

आप पक्षाला केलेली ऑफर खूप कमी आहे. महाराष्ट्रात ५० करोडचा हिशोब झालेला आहे. मग, पंजाब वाल्यांना एवढे कमी का देत आहेत. इलेक्ट्रॉन बाँडचे पैसे एवढ्या लवकर कसे संपले, पंजाब एवढा मोठा राज्य आहे आणि त्यांना फक्त २५ करोड, महाराष्ट्रात तुम्ही ५० करोडची बोली लावली होती. हा पंजाबचा अपमान आहे, भाजपचा हा खूपच घृनास्पद व्यवहार आहे,असे देखील संजय राऊत म्हणाले. आज महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटकांची बैठक झाली. ही बैठक खास करून प्रचार यंत्रणा, पुढील रणनीती, अजेंडा यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आहे. जागावाटप किंवा जागांची अदलाबदली यासंदर्भात तिथे कोणतीही चर्चा होणार नाही. कारण तो विषय संपलेला आहे. आता पुढील पाच टप्प्यात ज्या निवडणुका होत आहेत, त्यावेळेला एकत्र सभा घेणं, प्रचाराची दिशा काय असण, कोणत्या मुद्द्यावर आपण पुढे जायला हवं, राज्यातील प्रमुख प्रश्न कोणते आहेत, कोणत्या विभागात कोणी जायला हवं, उद्धव ठाकरे आणि शरद पवारजी यांची एकत्र सभा कुठे घ्यायला हवी यावर आज चर्चा होण्याची शक्यता असल्याचे संजय राऊतांनी सांगितले आहे.

देशात असलेली दळभद्री हुकूमशाही, शोषण सरकारकडून सुरू असलेला भ्रष्टाचार, संविधानाची हत्या यासाठी आम्ही जी एक लढाई करतोय, त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाची रक्षा करणे ही आमचीच जबाबदारी नाही, तर आंबेडकरांची आहे. मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतही पाऊल आंबेडकर उचलणार नाहीत. आंबेडकर यांचे आणि आमचे विचार एक आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होत Amol Kolhe यांनी घेतले महाराजांचे दर्शन

उन्हाळ्यात पाणी पिऊन कंटाळा आला असेल तर ‘हे’ उपाय नक्की करून पाहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss