Monday, May 20, 2024

Latest Posts

Sharad Pawar यांना Baramati तून संपवणार, Chandrakant Patil यांच्या वक्तव्यानंतर Ajit Pawar यांचे खडेबोल

काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत महायुतीच्या बैठकीत, 'शरद पवार यांना बारामतीतून संपवणार,' असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चांगलेच बोल सुनावले आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बारामतीत महायुतीच्या (Mahayuti) बैठकीत, ‘शरद पवार (Sharad Pawar) यांना बारामतीतून संपवणार,’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याच अनुषंगाने, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार (NCP) गटाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील यांना चांगलेच बोल सुनावले आहेत.

अजित पवार यांनी काल (गुरुवार, ८ मे) शिरूर येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी, त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “शरद पवार साहेब बारामतीत निवडणुकीला उभेच नव्हते तर तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत सुनेत्रा पवार (Suetra Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उभ्या आहेत. पराभव होईल तर या दोघींपैकी एकीचा होईल. मग तरीही चंद्रकांत पायातील तास का बोलून गेले माहीत नाही. जी व्यक्ती उभीच नव्हती त्याचं पराभव करण्याची भाषा योग्य नव्हती. त्यामुळे, चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य चूक होते, हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही चंद्रकांत पाटलांना म्हणालो कि, तुम्ही पुण्यात काम बघा. बारामतीत काय असेल ते मी बघतो. आमचे कार्यकर्ते बघतील. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढले नाही.”

बारामती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठकांचा सपाटा लावला होता. यावेळी, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका बैठकीत शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, “या बैठकीनंतर शरद पवार यां बारामतीतून संपवणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपाला संपवायचे आहे,” असे वक्तव्य केले होते.

हे ही वाचा:

Eknath Shinde आणि Ajit Pawar यांना BJP कवडीची किंमत देत नाही – Bhaskar Jadhav

अदानी-अंबानींकडून टेम्पोमधून पैसे घेण्याचा तुमचा अनुभव आहे का? Rahul Gandhi यांचा PM Modi यांना प्रतिसवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss