आंब्याचा सिझन आलाय, मग आमरस तर हवाच, काय आहे RECIPE?

आंब्याचा सिझन आलाय, मग आमरस तर हवाच, काय आहे RECIPE?

आमरस हा जगप्रसिद्ध पदार्थ आहे. आंबा हा वर्षातून एकदाच खायला मिळतो. त्यामुळे या सिझनमध्ये आंबे आवडीने खातात. वर्षभर आंबा खायला मिळावा अशी सर्वांचीच इच्छा असते. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आंब्यांपासून बनवलेले पदार्थ खायला आवडतात. उन्हाळ्यात आमरस आवर्जून बनवला जातो. आमरस बनवणं खूप सोपं आहे आणि झटपट बनवून तयार होतो. चला तर जाणून घेऊयात आमरस बनवण्याची रेसिपी.

साहित्य

कृती

सर्वप्रथम आंबे चांगले धुऊन घ्यावेत. आंब्यांचे सालं काढून त्यातला गर काढून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर टाकून बारीक करून घ्या. नंतर त्यामध्ये दूध, वेलची, जायफळ पूड, थोडीशी काळी मिरी पूड टाका. त्यानंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे साखर टाका. परत एकदा बारीक करून घ्या. एका भांड्यामध्ये आमरस रस काढून थोडं तूप आणि सुकामेवा पूड टाकून सर्व एकत्र करून घ्या. तयार आहे आमरस. तुम्ही हा आमरस चपाती किंवा पुरीसोबत खाऊ शकता.

हे ही वाचा:

‘मातीच्या भांड्यातील’ पाणी ठरेल उपयुक्त, काय आहेत फायदे?
बॉलिवूडवाले फक्त पैश्यांसाठीच एकमेकांबरोबर लग्न करतात, Nora Fatehi चा मोठा गौप्यस्फोट
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version