Tuesday, April 30, 2024

Latest Posts

बॉलिवूडवाले फक्त पैश्यांसाठीच एकमेकांबरोबर लग्न करतात, Nora Fatehi चा मोठा गौप्यस्फोट

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या डान्स आणि अदा यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ‘दिलबर’ गर्ल म्हणून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाहते तिच्या गाण्याची आवडीने वाट पाहत असतात. एका पॉडकास्ट शो दरम्यान तिने हिंदी चित्रपटसृष्टीमधील जोडप्यांबद्दल धक्कादायक पोलखोल केली आहे. ती नुकतीच रणबीर अलाहाबादिया या नामांकित युट्युबरच्या ‘पॉडकास्ट शो’ मध्ये आली होती. त्या मुलाखती दरम्यान तिने बॉलीवूड जोडप्यांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. ‘मी माझ्या आधी अशी अनेक जोडपी पाहिली आहेत ज्यांनी केवळ पैशासाठी लग्न केले. ते त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लग्न करतात. पैसा, प्रसिद्धी, सत्ता, नेटवर्किंग अशा गोष्टींसाठी ते पती किंवा पत्नीचा वापर करतात. यासारखी दुसरी कोणती वाईट गोष्ट काय असू शकते असे तिने त्यामध्ये नोराने मत मांडले आहे.

जर कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असेल तर काहीजण विचार करतात की या अभिनेत्यासोबत, अभिनेत्रीसोबत विवाह केला तर माझ्या आयुष्य चांगले राहील. चित्रपटसुष्टीमधील लोक खूपच हिशोबी असतात. अशी लोक पैशांसाठी आपलं सगळं आयुष्य उद्धवस्त करतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम करत नाही आणि त्याच्यासोबत तुम्ही लग्न करता, यापेक्षा काय वाईट असू शकते असेही नोराने सांगितले आहे. फक्त प्रसिद्धी आणि एका मोठ्या नेटवर्कचा हिस्सा होण्यासाठी ही लोक असे वागतात. आमच्या चित्रपटसुष्टी अशी अनेक लोक असल्याचा दावा तिने केला.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss