Tuesday, April 30, 2024

Latest Posts

‘मातीच्या भांड्यातील’ पाणी ठरेल उपयुक्त, काय आहेत फायदे?

मातीमध्ये अनेक प्रकारचे खनिजे असतात. हे पूर्वजांना माहिती होते. म्हणून त्यांनी मातीची भांडी बनवायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी माठातून पाणी पिण्याची सवय होती. आता परंपरा बदलत चालल्या आहेत. माठाच्या जागी आता फ्रिजचा वापर केला जातो. पण मातीच्या मडक्यातले पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? मडक्यातले पाणी पिल्यावर मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा Minerals and Electromagnetic Energy) मिळते. मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीचे सर्व गुणधर्म पाण्यात उतरतात. यामुळे शरीरावर चांगले परिणाम होतात. उन्हाळ्यामध्ये त्वचा आणि शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळाच्या दिवसात जर निरोगी राहायचं असेल तर माठातले पाणी पिया.

फ्रिजमधील पाणी पिल्यावर अनेक आजारांना बळी पडावा लागत.फ्रिजमधील पाणी पियाल्यावर वारंवार पाणी प्यावेसे वाटते. जर मातीच्या माठातले पाणी पियाल्यावर लवकर तहान भागते. सर्दी, खोकला, झाल्यावर डॉकटर थंड पाणी पिऊ नका असे सांगतात. पण मडक्यातले पाणी पिऊ शकता. माठातले पाणी पिल्याने रक्तदाब नियंत्रित राह्यण्यास मदत होते. फोड, मुरूम किंवा त्वचेच्या समस्यांनपासून आराम मिळतो. गर्भवती महिला किंवा लहानमुलांनी माठातले पाणी पिल्यास चांगले फायदे होतात. मातीमध्ये औषधी गुण असतात. त्यामुळे पाण्याची चव गोड लागते.

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss