Saturday, May 18, 2024

Latest Posts

इडली खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा मुगाच्या डाळीची इडली

नाश्तामध्ये बहुतेक लोक इडली, मेदुवडा, डोसा इत्यादी पदार्थाचा समावेश करतात. इडली आवडीने खातात. इडली ही पचायला हलकी असते आणि शरीरासाठी पौष्टिक असते. या पदार्थामुळे आरोग्यावर काहीच त्रास होत नाही. दररोज इडली तांदूळ आणि  उडीद डाळ घालून तयार केली जाते. प्रत्येक घरात मूग डाळ सहज उपलब्ध  असते . पण कधी मुगाच्या डाळीपासून इडली तयार केली आहे का? चला तर मग जाणून घेऊयात कशी बनवायची इडली.

साहित्य –

मूग डाळ, तांदूळ, उडीद डाळ, रवा, आलं लसूण पेस्ट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस

कृती –

सर्वप्रथम रात्री झोपण्यापूर्वी मूग डाळ, उडीद डाळ, तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर उडीद डाळ तांदूळ, मूग डाळ भिजत ठेवा. सकाळी भिजलेली मूग डाळ, उडीद डाळ, तांदूळ, मिक्सरमध्ये टाकून इडलीसाठी बारीक पीठ तयार करून घ्या. त्यामध्ये आलं लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून पुन्हा एकदा बारीक मिश्रण तयार करून घ्या. एका भांड्यामधे रवा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. १० ते १५ मिनिटे पीठ झाकून ठेवा. त्यानंतर नेहमी प्रमाणे इडली जशी करता तश्याच पद्धतीने इडल्या तयार करून घ्या. इडलीच्या भांड्याला तेल लावा, आणि त्यामध्ये हे मिश्रण टाका.  इडल्या तयार करून घ्या. तयार आहे  मुगाच्या डाळीची इडली. ही इडली चटणी किंवा सांबार सोबत खाऊ शकता.

हे ही वाचा:

भरउन्हात उसाचा रस पिताय ? एकच ग्लास प्या नाहीतर……

श्वेता तिवारीचा नवा बॉयफ्रेंड? ३३ वर्षीय अभिनेत्याला करतेय डेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss