Tuesday, April 23, 2024

Latest Posts

मिक्सरचा वापर न करता ५ मिनिटांत घरी तयार करा मोसंबीचा ज्यूस

प्रत्येकालाच संत्री मोसंबी (Mosambi) खायला आवडते.

प्रत्येकालाच संत्री मोसंबी (Mosambi) खायला आवडते. संत्री मोसंबी ही फळ लिंबूवर्गीय फळांमध्ये येतात. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात.मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. . हे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. फायबरमुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पचन, बद्धकोष्ठता या समस्यांपासून जर तुम्ही त्रस्त आहात तर तुम्ही तुमच्या आहारात मोसंबीचा समावेश करू शकता. मोसंबी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्वचा तरुण आणि चमकदार राहण्यासाठी रोजच्या आहारात एकतरी फळाचा समावेश करणे गरजेचे आहे. अनेकदा फळं नुसती खाऊन कंटाळा येतो अश्यावेळी तुम्ही घरीच ५ मिनीटात मोसंबीचा रस काढून पिऊ शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये मोसंबीचा रस कसा काढायचा.

साहित्य:-

२ मोसंबी
चवीनुसार साखर
चवीनुसार मीठ
पाणी

कृती:-

सर्वप्रथम मोसंबीचा रस काढण्यासाठी मोसंबी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती साली सकट आडवी कापून घ्या. कापून झाल्यानंतर एक टोप घेऊन त्यावर गाळणी ठेवा. त्यानंतर मोसंबीचा एक भाग घेऊन गोलाकार दिशेने फिरवत राहा. जसे जसे फिरवत जाल तसा रस टोपात जमा होईल. अश्या पद्धतीने रस काढून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालून मिक्स करून घ्या. आवश्यता असल्यास त्यात पाणी टाका. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये मोसंबीचा ज्यूस.

हे ही वाचा:

कदाचित त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल त्यामुळे ते असे काही तरी बोलत आहेत; छगन भुजबळांची जरांगेंवर टीका

मनोज जरांगेंना स्क्रिप्ट देतय कोण? याची पार्शवभूमी काय आहे? आमदार नितेश राणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss