Friday, April 19, 2024

Latest Posts

गूळ – चणे खायचा सल्ला का दिला जातो ? तुम्हाला माहित आहे का ?

गूळ आणि चणे हे दोन्ही असे पदार्थ आहेत की याला सहसा कोणी नाही म्हणतच नाही. हे दोन्ही पदार्थ सर्वांनाच खायला आवडत असतात.

Chana-Gud Benefits : गूळ आणि चणे हे दोन्ही असे पदार्थ आहेत की याला सहसा कोणी नाही म्हणतच नाही. हे दोन्ही पदार्थ सर्वांनाच खायला आवडत असतात. तसेच ॲनिमिया किंवा पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास अनेकदा चणे आणि गूळ एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो. चण्यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरातील प्रत्येक कमकुवतपणा दूर होतो.

फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, सुक्रोज, ग्लुकोज आणि झिंक यांसारखे पोषक घटक गुळात मुबलक प्रमाणात आढळतात. त्याचवेळी चण्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, डी आणि प्रथिने समृद्ध आहे. या गुणामुळे चणे आणि गूळ एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरात एनर्जी येते आणि ते मजबूत होतात.

तुमचे हृदय निरोगी ठेवा –
जर तुम्ही दररोज गूळ आणि हरभरा खाल्ला तर तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच शरीराचे वजन नियंत्रित ठेवते. गूळ आणि चणे खाल्ल्याने शरीरातील पचन क्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

शरीर मजबूत होते –
चणे आणि गूळ खाल्ल्याने शरीरातील सर्व प्रकारची कमजोरी दूर होण्यास मदत होते. यामुळे ॲनिमियासारखा आजार होत नाही. ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांच्यासाठी आरोग्य तज्ञ दररोज चणे आणि गूळ खाण्याचा सल्ला देतात.

हाडे मजबूत होतात –
चणे आणि गूळ रोज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

बद्धकोष्ठतेपासून सुटका –
जर तुमची पचनक्रिया खराब असेल आणि तुम्हाला ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारखी समस्या असेल तर चणे आणि गूळ खाल्ल्याने या समस्येपासून सुटका मिळते. यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे चणे आणि गुळाचे सेवन रोज करावे.

हे ही वाचा:

 भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे

‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss