Tuesday, May 21, 2024

Latest Posts

राशी भविष्य २ जून 2022

मेष : घरातील वयोवृद्ध मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

वृषभ : भागीदाराकडून अतुलनीय सहकार्य लाभल्याने समूहास शोभेल अशी कामगिरी घडेल.

मिथुन : संतती कडून अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद प्राप्त होईल.

कर्क : आपण शब्दबद्ध केलेले काव्य इतरांना स्फूर्ती देणारे ठरेल.

सिंह : घरगुती विषय चव्हाट्यावर येणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी. विषेश करून आईच्या आरोग्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

कन्या : आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे. मात्र वस्तू किंवा धातुरुपातील गुंतवणूक नुकसानीची ठरू शकते.

तूळ : विशेषतः शेती विषयक केलेली संशोधन लोकोपयोगी ठरतील.

वृश्चिक : वयोवृद्ध मंडळींनी आरोग्यविषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

धनु : आर्थिकदृष्ट्या घेतलेले कोणतेही निर्णय नुकसानीचा सौदा ठरण्याची शक्यता आहे.

मकर : परदेशातील हितसंबंध सांभाळून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.

कुंभ : पारिवारिक स्नेहसम्बन्ध सुधारतील.

मीन : मंदिर जीर्णोद्धार अथवा समाज मंदिराच्या निर्मिती सारखे विषयांत रस निर्माण होईल.

Latest Posts

Don't Miss