Friday, April 26, 2024

Latest Posts

‘उमंग 2023’ मध्ये बॉलीवूडमधील कलाकारांची मांदियाळी,सेलिब्रेटींची ग्रॅंन्ड एन्ट्री

'उमंग 2023' मध्ये बॉलीवूडमधील कलाकारांची मांदियाळी,सेलिब्रेटींची ग्रॅंन्ड एन्ट्री

‘उमंग 2023’ हा मुंबई पोलिसांचा कार्यक्रम नुकताच   जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती  लावली. दीपिका पादुकोण, रवीना टंडन, कियारा आडवाणी आणि भूमी पेडनेकरसह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात उपस्थित होते. आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सेलिब्रिटींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर दुसरीकडे शाहरुख खानने  आपल्या दमदार एन्ट्रीने तर भाईजानने जबरदस्त डान्सने या इव्हेंटमध्ये चार चाँद लावले. ‘उमंग 2023’ या कार्यक्रमात शाहरुख खानने आपल्या बॉडीगार्ड्सह ग्रँड एन्ट्री घेतली. काळ्या सनग्लासेसमध्ये शाहरुख खान खूपच डैशिंग दिसत होता. तर सलमान खानदेखील ब्लॅक सूटमध्ये दिसून आला. सलमानच्या या अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

‘उमंग 2023’ या पोलिसांच्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, रणवीर सिंह, हिमेश रेशमिया, सिद्धार्थ मल्होत्रा, ईशान खट्टर, सनी कौशल आणि अरबाज खानसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने पोलीस वॅनवर चढून चाहत्यांसोबत चर्चा केली. या कार्यक्रमादरम्यान सेलिब्रिटींमधील जबरदस्त बॉन्डिंग दिसून आली.

‘उमंग 2023’ या कार्यक्रमातील कतरिना कैफ आणि शहनाज गिल यांचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. त्यांच्या ब्लॅक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ‘नागिन’फेम तेजस्वी प्रकाश हिचा देखील ‘उमंग 2023′ या कार्यक्रमातील लूक हा हटके होता.’उमंग 2023’ या कार्यक्रमात शहनाज गिल आणि दीपिका पादुकोण एकत्र दिसून आल्या. या कार्यक्रमादरम्यान दोघी आनंदात, एकमेकींसोबत गप्पा मारताना दिसून आल्या. ‘उमंग 2023’ या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत.

पोलीस  आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, आणि राजकारणी मंडळींनी हजेरी लावली. त्यांचे लूक्स चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. उमंग २०२३ मध्ये खऱ्या अर्थाने बॉलीवुडकऱ्यांची मांदियाळी येथे पाहायला मिळाली.प्रत्येकांचा हटके ग्लॅमरस अंदाज येथे पाहायला मिळाला.दरम्यान बॉलीवूडचा कोणता ही इव्हेंन्टला सगळ्या कलाकारांचा डॅशिंग अंदाज हा लक्ष वेधून घेणारच असतो.

हे ही वाचा:

Christmas 2023: जगातल्या जुन्या चर्चमध्ये ६ जानेवारीला होते Christmas Celebration

Christmas 2023: जगातल्या जुन्या चर्चमध्ये ६ जानेवारीला होते Christmas Celebration

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss