Friday, April 19, 2024

Latest Posts

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने होऊ शकतो गंभीर आजार, जाणून घ्या सविस्तर माहिती

प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये मिठाचा चवीसाठी वापर केला जातो.

प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये मिठाचा चवीसाठी वापर केला जातो. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. जर एखाद्या दिवशी जेवणात मीठ नसेल तर जेवण खूप बेचव लागते. जेवणामध्ये योग्य प्रमाणात मीठ टाकले तरच जेवणाला चव येते. पण काहीवेळेस जेवणात मीठ जास्त झाले तर जेवणाची चव बिघडते. तसेच त्याचे शरीरावर सुद्धा वाईट परिणाम होतात.आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. जास्त प्रमाणात मीठ खाणे हे धोक्याचे आहे. यामुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो.

मीठामध्ये सोडियम ४० टक्के आणि क्लोराईडचे प्रमाण असते. हे सोडियम मीठाच्या माध्यमातून शरिरात जाते .सोडियमची शरिराला आवश्यकता असते. शरिरातील पेशींमध्ये प्लाझ्मा टिकून राहण्यासाठी, शरिरातील क्षार, पेशींचे कार्य संतुलित ठेवण्याचे काम मीठ करते. मात्र हेच मीठ जर जेवणात किंवा इतर पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचे शरिरावर गंभीर परिणाम होतात.जात तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ तर त्याचे तुमच्या शरिरावर गंभीर परिणाम होतील. हृदयरोग, रक्तदाव वाढीच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय लठ्ठपणाचीही समस्या निर्माण होते. मीठचे अति प्रमाणात सेवन हे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरू शकते. यामुळे हार्टअॅटॅकचा धोका वाढण्याची शक्यता असते.

एका व्यक्तीने पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठ रोजच्या आहारात खाल्ले पाहिजे. २ ते ३ वर्षांच्या लहान मुलांना कमीच मीठ दिले पाहिजे. गर्भवती महिलांना १, ५०० मिलिग्रॅम म्हणजे चार ग्रॅमच्या आसपास मीठ खावू शकता. आयोडिन युक्त मीठ खाण्यावर जास्त भर दिला पाहिजे.बाहेरून आणत असलेल्या चमचमीत पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते.चिप्स, कुरकुरे अशा पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. असे पदार्थ खाणे शक्यतो टाळणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात मिठाचे सेवन केले पाहिजे. नाहीतर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. यामुळे अनेक आजार उदभवू शकतात.

हे ही वाचा: 

नागपुरात ११ दिवसांपासून उपोषण करणाऱ्यांकडे शासन, प्रशासनाचे अक्ष्यम दुर्लक्ष, नाना पटोले

अक्षय कुमार सादर करत आहेत एक प्रभावशाली शिव गीत “शंभू”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss