Sunday, May 19, 2024

Latest Posts

तुम्हाला हँडवॉश घरी बनावता येतो का ? तर पहा

हॅन्ड वॉशची (Hand Wash) खरी गरज ही तुम्हाला कोरोनाच्या (Corona) काळात लक्षात आलीच असेल. कारण कोरोनाच्या काळामध्ये हँडवॉशची (Hand Wash) उपलब्धता खूप कमी होती आणि त्यामुळे सर्वानाच हँडवॉश मिळू शकत नव्हता.तसेच सध्याच्या काळात कोरोना पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे काही दिवसांपासून चायना (China) आणि अमेरिका (America) या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चायनामध्ये तर पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा देखील केली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर भारताकडूनही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे पुन्हा तुम्हाला प्रामुख्याने हँडवॉशची (Hand Wash) गरज भासण्याची शक्यता आहे. तसही खबरदारी म्हणून तुम्ही हँडवॉशचा वापर करतच असाल. पण तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की नेमका हा हँडवॉश बनवतात तरी कसा? तर आता आम्ही तुम्हाला प्रक्रिया सांगणार आहोत.

तुमच्या लहानपणी तुम्ही तुमच्या आजी किंवा आजोबांकडून ऐकलंच असेल की जेव्हाही तुम्ही बाहेरून घरी परततात. त्यावेळेस नियमितपणे हात आणि पाय धुवावे. असे आपण लहान पाणापासूनच ऐकत आलो आहोत. पण कोरोनाने या गोष्टीचे महत्व प्रखर्षाने दाखवून दिले आहे. त्यामुळेच तुम्हाला हँडवॉश (Hand Wash) घरी कसा बनवावा हे माहित असणे गरजेचे आहे. आता आम्ही तुम्हाला पुढे हँड वॉश बनवण्याचे हे सांगणार आहोत.

लिक्विड हँडवॉश बनवण्यासाठी:

साहित्य : ½ कप बारीक किसलेला बार साबण , तुम्ही जो साबण घरात वापरतात त्याला चिरून घ्या. त्यानंतर १/४ कप पाणी घ्या.

हॅन्ड वॉश बनवण्याची प्रक्रिया :

साबणाचा बार किसून किंवा बारीक चिरून घ्या. किसून घेण्यासाठी तुम्ही चाकूचा वापर करू शकता.

एका सॉसपॅनमध्ये पाणी घ्या आणि उकळी येई पर्यंत वाट पहा. नंतर, गॅस बंद करा आणि बारीक केलेला साबण त्या उकळलेल्या पाण्यात मिसळा. साबण पाण्यात विरघळत नाही तोपर्यंत ते सतत ढवळत राहा. या वेळेस पाणी आणि साबणाचे मिश्रण हे द्रव स्वरूपात असेल.

साबण पाण्यात विरघळल्यानंतर हे मिश्रण किमान १५ मिनिटे थंड होऊ द्या. नंतर, ते पुन्हा ढवळा. त्यानंतर तुमचं मिश्रण थोडे घट्ट होईल. तुम्ही तयार केलेले मिश्रण हे जवळपास ८ तास बाजूला ठेवा आणि पूर्णतः थंड होऊ द्या.

तुमचा हँडवॉश (Hand Wash) आता तयार झाला आहे. तो पूर्णतः तयार झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी नीट ढवळून पहा . जर ते खूप पातळ वाटत असेल तर ते पुन्हा गरम करा आणि त्यात आणखी साबण घाला. जर ते खूप घट्ट वाटत असेल तर ते पुन्हा गरम करा आणि आणखी पाणी घाला.यानुसार तुम्हाला हवं तसं त्यात तुम्ही बदल करू शकता.

हे ही वाचा:

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदान्ना यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आला समोर, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार चित्रपट

जामीन मजूर होऊनही कोचर दाम्पत्यांना कारागृहात काढावी लागणार रात्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss