Monday, April 22, 2024

Latest Posts

शरीरासाठी पोषक ठरतात मेथीचे दाणे,आरोग्यासाठी आहेत फायदेशीर

हिवाळा सुरु आहे.यावेळी आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय करत असतो.

हिवाळा सुरु आहे.यावेळी आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय करत असतो.दरम्यान हिवाळ्यात अनेक हिरव्या पालेभाज्या मार्केटमध्ये येतात. हिवाळ्यात पालेभाज्यांचा समावेश खुप असतो.हिरव्या भाजांमध्ये अनेक पौष्टिक त्तत्व असतात. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथीचा ही समावेश आहे. मेथीमध्ये व्हिटॅमिन सी आणि विविध प्रकारच्या पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. मेथीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.दरम्यान  मेथीचे दाणे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर्स, व्हिटॅमिन सी, लोह आणि इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. आज आपण मेथीच्या दाण्यांचे आरोग्याला होणारे फायदे कोणते? ते  जाणून घेऊयात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

मेथीच्या दाण्यांचा उपयोग रक्तातील साखरेला नियंत्रित आणण्यासाठी वापरलं जातं,त्याच सेवन केलं जातं.मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश करणे, हे मधुमेहाच्या रूग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये शरीरात विरघळणाऱ्या फायबर्सचा समावेश असतो. जे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

लोहाची कमतरता दूर होते

मेथीच्या दाण्यांमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण आढळून येते. मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यासोबतच मेथीच्या दाण्यांमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.लोहामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. खास करून गर्भधारणे दरम्यान आणि स्तनपाण करण्याच्या काळात लोहाची कमतरता असलेल्या महिलांसाठी मेथीचे दाणे उपयुक्त आहेत.

सांधेदुखीपासून आराम मिळेल

मेथीचा समावेश आहारात केल्याने सांधेदुखीपासून आराम देखील मिळतो.मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, फायबर्स, फॉस्फरस आणि कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. या सर्व पोषकघटकांमुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्मांचा समावेश असतो. हे गुणधर्म आपल्या शरीरातील सांध्यांमधील सूज कमी करण्यास मदत करतात.काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज रात्री एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर, सकाळी चावून खा. यामुळे, सांधेदुखीपासून तुम्हाला आराम मिळण्यास मदत होऊ शकेल.त्यामुळे मेथीच्या दाण्याचा आहारात समावेश करणं गरजेच ठरतं.

हे ही वाचा: 

‘रमशा फारुकी’ ठरली ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाची विजेती !

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात  राहुल देव साकारणार काकर खानची भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss