Saturday, March 2, 2024

Latest Posts

‘न्यू इयर’ पार्टीसाठी करा हटके वेस्टन लूक,जाणून घ्या आउटफिट टिप्स

'न्यू इयर' पार्टीसाठी करा हटके वेस्टन लूक,जाणून घ्या आउटफिट टिप्स

२०२३ या सरत्या वर्षाला बाय बाय करत नविन वर्षात आपण सगळेच लवकरच पदार्पण करणार आहोत.नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असतो,दरम्यान आता प्रत्येक जण ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीच्या तयारीत असणार आहेत.अशा परिस्थितीत कोणी आपल्या घरी पार्टी आयोजित करतात,तर कोणाला पार्टीला जाण्याचे आमंत्रण मिळाले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही असे काही आउटफिट स्टाईल करणे महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये तुम्ही सगळ्यांमध्ये वेगळे आणि सुंदर दिसाल.मग आता यावेळी आपल्याला प्रत्येक वेळी तिच तिच फॅशन ड्रेस घालण्याचा कंटाळा आला असणार हे नक्की त्यामुळे यावेळी काहीतरी वेगळ ट्राय करायच पण समझत नाही,तर काळजी करु नका यावेळी तुम्हाला मी काही हटके स्टाईल सांगणार आहे,ती नक्की फॉलो करा.त्यामुळे तुम्ही सगळ्यात उठून दिसाल.

साडी गाऊन

आजकाल इंडो वेस्टर्न ड्रेसचा ट्रेंड आहे. म्हणूनच प्रत्येकाला या आउटफिट्समध्ये प्रयोग करायला आवडतात. अलीकडेच टीव्ही अभिनेत्री हिना खान साडी गाऊनमध्ये दिसली होती. यामध्ये तिने कट आऊट पल्लूसोबत स्टाइल केली आहे. ज्याची डिझाईन कमाली कॉउचरने केली होती.

यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही तुमच्या पार्टी लुकमध्ये या प्रकारचा आउटफिट देखील जोडू शकता. यामध्ये स्टायलिशही दिसाल. असे आउटफिट्स तुम्हाला 1000 ते 2000 रुपयांना बाजारात मिळतील.

क्रेप मॅक्सी ड्रेस

जर तुम्हाला लॉन्ग ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही क्रेप मॅक्सी ड्रेस घालू शकता. यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. तसेच तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे दिसाल. त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही बाजारात किंवा ऑनलाइन विविध डिझाइन पर्यायांसह खरेदी करू शकता.

यामध्ये तुम्हाला फुल स्लीव्हज, कट स्लीव्हज आणि अगदी ऑफ शोल्डर ड्रेसही मिळतील. ज्याला तुम्ही पार्टीमध्ये स्टाइल करू शकता. अशा प्रकारचे ड्रेस तुम्हाला बाजारातून 500 ते 1000 रुपयांना मिळतील.

बेल बॉटम पँट विद कोट

जर तुम्हाला जुना ट्रेंड रिपीट करायचा असेल तर तुम्ही बेल बॉटम पँट स्टाईल करू शकता. काजोलने देखील हा काळा आणि राखाडी शिमर ड्रेस परिधान केला आहे. आपण आपल्या आवडीचे आणखी काही पर्याय वापरून पाहू शकता.

हे तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची संधी देईल. काजोलचा हा आउटफिट मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. तुम्ही ते बाजारातून 2000 ते 3000 रुपयांना खरेदी करू शकता आणि पार्टीमध्ये स्टाइल करू शकता.

हे ही वाचा : 

‘८० लाख चालकांचा रोजगार बुडाणार’, चालकविरहित गाड्या भारतात येणार नाहीत, नितीन गडकरी

हाडे मजबुत ठेवण्यासाठी ‘या’ १० फळांचा खाण्यात वापर करा,शरीरातील कॅल्शियमध्ये देखील वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

 

Latest Posts

Don't Miss