Wednesday, April 24, 2024

Latest Posts

यंदाच्या पावसाळ्यात चपला खरेदी करताय ? पहा चपलांचे बजेट सहित लेटेस्ट पॅटर्न

या दरम्यान हलके फुलके ड्रेसेस विकत घेण्याकडे विशेष पसंती दर्शवली जाते. अशा वेळी या कपड्यांवर नेमक्या कोणत्या चपला घालाव्यात असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. आज आपण यंदाच्या पावसाळ्यात बाजारात चपला व शूज करिता काय काय पर्याय उपलब्ध आहेत हे पाहणार आहोत.

मे महिना उलटून गेला की जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची चाहूल लागते. पण यावर्षी एक आठवडा संपून ही पावसाचा पत्ता नाही… उलट कडक उन्हामुळे लोकं हैराण झाले आहेत. पण लवकरच मान्सून मुंबई मध्ये धडकणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. लवकरच शाळा-कॉलेज सुरु होतील आणि छत्र्या, रेनकोट व पावसाळी चपला खरेदीसाठी दुकानांबाहेर गर्दी जमण्यास सुरुवात होईल. या दरम्यान हलके फुलके ड्रेसेस विकत घेण्याकडे विशेष पसंती दर्शवली जाते. अशा वेळी या कपड्यांवर नेमक्या कोणत्या चपला घालाव्यात असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. आज आपण यंदाच्या पावसाळ्यात बाजारात चपला व शूज करिता काय काय पर्याय उपलब्ध आहेत हे पाहणार आहोत.

१. आजकाल बाजारात शूज घेण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात. त्यातल्यात त्यात कॅज्युअल शूज घेण्यास सर्वात जास्त पसंती असते. कारण फॅशन प्रमाणे हे शूज चालताना देखील आरामदायी ठरतात. बाजारात हे शूज तुम्ही २५० ते ४०० रुपयांपर्यंत आरामात खरेदी करू शकता. यात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार विविध रंग व पॅटर्न ही सहज मिळतात.

२. हे शूज गेल्या काही वर्षांपासून जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत. यांना क्रॉक्स असे म्हणतात. हे शूज तुम्ही एरव्ही कधी ही घालून फिरू शकता. क्रॉक्स तुम्ही कॅज्युअल कपड्यांवर ही परिधान करू शकता. क्रॉक्स तुम्हाला सहज कुठल्याही दुकानात उपलब्ध होतात. बाजारात क्रॉक्स तुम्हाला २०० ते ३५० पर्यंत खरेदी करता येतील.

३. जर तुम्हाला शूज घालायला आवडत नसतील तर तुम्ही या सॅन्डल विकत घेऊ शकता. यांना वेजेस देखील म्हणतात. या सॅंडल तुमच्या पायांना आरामदायक ठरतात. बाजारात वेजेस वेगवगेळ्या रंगात तुम्हाला उपलब्ध होतात. हे तुम्ही ऑफिस मध्ये ही घालू शकता. वेजेस प्रत्येक कपड्यावर चांगले दिसतात. बाजारात तुम्हाला हे ३०० ते ५०० पर्यंत उपलब्ध होतात.

४. तुम्हाला सॅंडल किंवा शूज व्यतिरिक्त काही घ्यायचे असल्यास तुम्ही या चपला नक्की वापरून पाहू शकता. या सॉफ्ट असल्यानी तुमच्या पायांना आराम मिळतो. चालताना आरामदायी वाटतातच परंतु या चपला फ्लॅट असल्याने चालताना पडण्याचा धोका संभवत नाही. या चॅपलमध्ये तुम्ही किती ही तास हिंडू – फिरू शकता.
या चपला तुम्ही बाजारात २०० ते १००० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या रेंज मध्ये मिळू शकतात. या चपला सगळ्याचं कपड्यांवर तुम्ही घालू शकता.

Colorful Sandal

५. तुम्हाला जर रंगीबेरंगी चपला घालायला आवडत असतील तर तुमच्यासाठी हा पर्याय अगदी योग्य आहे. या कलरफूल चपला अगदी कोणत्याही कपड्यांबरोबर तुम्ही वेअर करू शकता. २५० ते ५०० रुपयांपर्यंत या चपला तुम्हाला बाजरात मिळतात.

वरील सर्व फोटो क्रेडिट Google फोटोज

Latest Posts

Don't Miss